Dharmendra Pradhan Daughter : धर्मेंद्र प्रधानांच्या मुलीची आंतरराष्ट्रीय कायद्यात पदवी, नैमिषा प्रधान सध्या काय करते?

Published : Jul 26, 2026, 04:28 PM IST
Dharmendra Pradhan Daughter

सार

Who is Naimisha Pradhan : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी नैमिषा प्रधानने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. तिने आंतरराष्ट्रीय कायद्यात एलएलएमची पदवी मिळवली आहे. तिने अनेक संस्थांमध्ये इंटर्नशिप, रिसर्च केलं आहे.

नवी दिल्ली : नीट पेपर लीक प्रकरण आणि CJP आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल. त्यांच्या राजीनाम्यामुळे त्यांची मुलगी नैमिषा प्रधान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. CJP आंदोलनादरम्यान, नैमिषा परदेशात शिकत असल्यामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगमुळे तिला तिचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद करावं लागलं होतं. पण नैमिषा प्रधानची ओळख फक्त एका मोठ्या राजकीय घराण्यातील सदस्य एवढीच नाही. तिने शिक्षण, संशोधन आणि पब्लिक पॉलिसीच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नैमिषाचा प्रभावी शैक्षणिक प्रवास

नैमिषा प्रधानने तिचं शालेय शिक्षण मायो कॉलेज गर्ल्स स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्समध्ये बीएची पदवी घेतली. राजकारण आणि प्रशासनाचा अभ्यास केल्यानंतर तिने कायद्याच्या शिक्षण घेतलं. ओ.पी. जिंदाल ग्लोबल लॉ स्कूलमधून एलएलबी पूर्ण केलं.

उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली. तिथे तिने टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या 'द फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड डिप्लोमसी'मधून आंतरराष्ट्रीय कायद्यात मास्टर डिग्री LLM मिळवली. ही संस्था जागतिक धोरण, डिप्लोमसी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासासाठी जगभरातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक मानली जाते.

पब्लिक पॉलिसी आणि संशोधनात अनुभव

शिक्षण घेत असतानाच नैमिषाने अनेक मोठ्या संस्थांमध्ये काम करून प्रत्यक्ष अनुभवही मिळवला. तिने नीती आयोग (NITI Aayog), कार्नेगी इंडिया (Carnegie India) आणि सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (CSIS) यांसारख्या संस्थांमध्ये रिसर्च आणि इंटर्नशिप केली आहे.

याशिवाय, तिने राष्ट्रीय महिला आयोगातही कामाचा अनुभव घेतला आहे. न्यायालयीन प्रक्रिया जवळून समजून घेण्यासाठी तिने दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांसोबत इंटर्नशिप केली.

सध्या नैमिषा प्रधान काय करते?

सध्या नैमिषा प्रधान यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) मध्ये पब्लिक पॉलिसी असोसिएट म्हणून काम करते. या भूमिकेत ती भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्य, सार्वजनिक धोरण आणि विविध पॉलिसीच्या मुद्द्यांवर काम करते. तिचं शिक्षण आणि संशोधनाचा अनुभव तिच्या या कामासाठी खूप महत्त्वाचा ठरतो.

कलेचीही आवड

शिक्षण आणि करिअरमधील यशासोबतच नैमिषा एक प्रशिक्षित ओडिसी शास्त्रीय डान्सर आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Assam Flood : आसाममध्ये पुराचा हाहाकार, मृतांचा आकडा ६६ वर; ८१० गावं पाण्याखाली, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
Amit Shah : भाजप कार्यकर्त्यांसाठी कोणत्याही पदापेक्षा विद्यार्थी, देश महत्त्वाचा; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया