
Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. देशभरातील रामभक्त वेगवेगळ्या पद्धतीने मनातील भक्ती-भावना व्यक्त करताना दिसत आहेत. रामलला यांचे शुभ आशीर्वाद मिळावेत, त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी; यासाठी देशभरातील भाविक वेगवेगळ्या गोष्टी करताहेत.
हैदराबादमधील एका व्यक्तीनेही रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तब्बल 1 हजार 265 किलोग्रॅम वजनाचा लाडू तयार केला आहे. नागभूषण रेड्डी यांनी हा महाकाय लाडू तयार केला आहे. श्री राम मंदिरामध्ये हा लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केला जाणार आहे. 17 जानेवारीला हा लाडू रेफ्रिजरेटेड काचेच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आला आहे आणि याच दिवशी हा महाकाय लाडू अयोध्येला पाठवण्यात येईल.
शुभ प्रसंग अधिक खास व्हावा, यासाठी तयार केला लाडू
लाडू तयार करणारे नागभूषण रेड्डी म्हणाले की, राम मंदिरासाठी काहीतरी वेगळे करायचे होते. ते वर्ष 2000 पासून श्री राम केटरिंग सर्व्हिसचा व्यवसाय करत आहेत. राम मंदिराचे भूमिपूजन होत असताना त्यांच्या मनात ही कल्पना आली होती.
महाकाय लाडू कसा तयार करण्यात आला?
नागभूषण यांनी सांगितले की, इतका महाकाय लाडू तयार करण्याची प्रक्रिया सोपी नव्हती. यासाठी बराच वेळ द्यावा लागला आणि कष्ट घ्यावे लागले. लाडू तयार करण्यासाठी जवळपास 30 जण सलग 24 तास काम करत होते. लाडूसाठी लागणारी सामग्री आणल्यानंतर त्यास योग्य आकार देण्यासाठी चार तास लागले.
यानंतर लाडूवर काजू, पिस्ता आणि बदाम अशा सुकामेव्याचा वापर करून ‘जय श्री राम’ लिहिण्यात आले. रामलला यांना लाडूचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर भाविकांमध्ये त्याचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येईल.
आणखी वाचा
Ayodhya Ram Mandir सोन्यासारखे चमकेल श्री राम मंदिर, नवीन फोटो पाहिले?
VIRAL VIDEO : जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थिनीने गायले राम भजन, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मौनी बाबा सोडणार मौनव्रत, वयाच्या 10व्या वर्षी केला होता संकल्प