Tamil Nadu Floods : तमिळनाडूमधील पुरात अडकलेल्या 20 हजार नागरिकांसाठी बचाव कार्य वेगाने सुरू, NDRF-SDRFचे जवान तैनात

Tamil Nadu Floods : तमिळनाडूतील दक्षिण भागात पुर आल्याने 20 हजार नागरिक पुरात अडकल्याची माहिती देण्यात आली आहे. या पूरग्रस्त भागात बचाव कार्य वेगाने सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना अन्नपुरवठा केला जात आहे.

Chanda Mandavkar | Published : Dec 20, 2023 5:55 AM IST / Updated: Dec 26 2023, 12:26 PM IST

Chennai : तमिळनाडूमधील दक्षिण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराची स्थिती निर्माण होत नद्या तुडूंब भरून वाहू लागल्या. याशिवाय रस्तेही जलमय झाले आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पुराची स्थिती निर्माण झाल्याने यामध्ये 20 हजार नागरिक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. 

पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफचे (SDRF) जवान तैनात करण्यात आले आहेत. याच दरम्यान, सैन्य दलाचे सैनिकही मदतीसाठी आले आहेत.

मुसळधार पावसामुळे ताम्रबराणी नदीने (Thamirabarani River) आपली पाण्याची पातळी ओलांडली गेली आहे. पुराचा सर्वाधिक फटका श्रीवैकुंटम (Srivaikuntam) शहराला बसला आहे. या शहरातील बहुतांश परिसर पाण्याखाली गेला आहे. दुर्गम क्षेत्रात अडकलेल्या नागरिकांना सैन्य दल आणि एनडीआरएफच्या टीमकडून बाहेर काढण्यात येत आहे.

हेलिकॉप्टरमधून अन्नपुरवठा
तमिळनाडूत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हवाई दलाचे Mi-17 V5 आणि ALH हेलिकॉप्टर आणण्यात आले आहे. या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूरग्रस्त नागरिकांसाठी 10 टनहून अधिक अत्यावश्यक सामानाचा पुरवठा करण्यात आला आहे. पुरात अडकलेल्या महिलांसह मुलांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

याशिवाय तमिळनाडूत आलेल्या पुरामुळे 10 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पूरग्रस्त भागातील तीन जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.

रेल्वे स्थानकातील प्रवाशांची मदत
दक्षिण तमिळनाडूमधील थुथुकुडी शहराजवळील श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकालाही पुराचा फटका बसला. रेल्वे स्थानकात रविवारी (17 डिसेंबर, 2023) 809 प्रवासी अडकले होते. या प्रवाशांपैकी 300 नागरिकांना सोमवारी (18 डिसेंबर, 2023) तर अन्य 509 प्रवाशांना मंगळवारी (19 डिसेंबर, 2023) रेल्वे स्थानकातून सुखरूप बाहेर काढले.

आणखी वाचा: 

काय सांगता! चक्क राम मंदिराच्या थीमवर आधारित तयार केलाय नेकलेस, पाहा VIDEO

Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षेमध्ये सर्वात गंभीर चूक

Article 370 : या न्यायाधीशांनी कलम 370 वर सुनावला ऐतिहासिक निर्णय

Share this article