Watch : 'मक्कल पदयात्रा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक उत्तम अनुभव', BJP नेते अन्नामलाई यांनी पंतप्रधानांसह अमित शाह यांच्या प्रयत्नांचे केले कौतुक

तमिळनाडूमधील भाजप नेते के अन्नामलाई यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर व्हिडीओ शेअर करण्यासह त्यांच्या गेल्या सहा महिन्यातील 234 विधानसभेच्या मतदारसंघांच्या प्रवासाबद्दल एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. 

Chanda Mandavkar | Published : Feb 28, 2024 5:05 AM IST / Updated: Feb 28 2024, 10:41 AM IST

PM Narendra Modi in Tamil Nadu : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (27 फेब्रुवारी) तमिळनाडू दौऱ्यावर आले होते. यादरम्यान, पंतप्रधानांनी तिरुपुर येथील एका सभेला संबोधित केले. याच पार्श्वभूमीवर तमिळनाडूतील भाजप नेते के. अन्नामलाई (K. Annamalai) यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, "एन मन एन मक्कल पदयात्रेदरम्यान तमिळनाडूतील 234 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या गेल्या सहा महिन्यांतील आमच्या प्रवासाची एक झलक आहे."

याशिवाय अन्नामलाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहे. अन्नमलाई यांनी म्हटले की, “या सहा महिन्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान अविश्वसनीय होते. एन मन एन मक्कल पदयात्रेची (En Mann En Makkal PadaYatra) सुरूवात माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याद्वारे रामेश्वरम येथून करण्यात आली होती. याचे समापन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. खरंतर एन मन एन मक्कल पदयात्रा माझ्या आयुष्यातील एक उत्तम अनुभव होता.”

आणखी वाचा : 

Narendra Modi : केरळमध्ये पंतप्रधानांनी दिला 400 पार चा नारा, आता भविष्य कोणापासून लपले नाही

Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांना रशियाच्या केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले, राकेश शर्मा यांनी प्रशिक्षण घेतले होते

Gaganyaan Mission : गगनयान मोहीमेसाठी अंतराळवीरांच्या नावांची घोषणा, वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Share this article