India vs England semi final match: भारत आणि इंग्लंड संघामध्ये 27 जूनला टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्या फेरीतील सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून सामना पाहता येणार आहे.
India vs England semi final match: आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 मधील दुसऱ्या उपांत्या फेरीतील सामना भारत विरुद्ध इंग्लंडच्या संघासोबत 27 जूनला होणार आहे. दोन्ही संघातील सामना प्रोविडेंस स्टेडिअम, गुयाना येथे रंगणार असून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून पाहता येणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कपमध्ये दमदार खेळी केल्याचे दिसून आले आहे. याशिवाय भारतीय संघाचा एकही सामन्यात पराभव अद्याप झालेला नाही.
खरंतर, वर्ष 2022 च्या टी20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये भिडंत झाली होती. यामध्ये इंग्लंड संघाचा विजय झाला होता. अशातच आता भरतीय संघ इंग्लंडविरोधात झालेल्या पराभवाचा आजच्या सामन्यात बदला नक्कीच घेण्याची चर्चा आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 रेकॉर्ड
भारत विरुद्ध इंग्लंडमध्येमध्ये आतापर्यंत झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही संघांचा एकूण 23 वेळा आमनासामना झाला आहे. यापैकी 12 वेळा भारतीय संघाचा विजय तर 11 वेळा इंग्लंड संघाने विजय मिळवला आहे. टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाल्यास भारत आणि इंग्लंडच्या संघामध्ये आतापर्यंत चार वेळा सामना झाला आहे. यामध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 वेळा सामना जिंकला आहे. महणजेच यंदा होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत जो संघ जिंकणार तो रेकॉर्डमध्ये पहिल्या क्रमांकावर येईल.
पाऊस पडल्यास भारत थेट फायनलमध्ये पोहोचणार
भारत आणि इंग्लंडमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यावर पावसाचे संकट आहे. या उपात्यं फेरीसाठी कोणताही रिजर्व्ह डे ठरवण्यात आलेला नाही. संपूर्ण सामन्यासाठी 250 मिनिटांचा म्हणजेच 4 तास 10 मिनिटांचा वेळ वाढवण्यात आला आहे. म्हणजेच भारत विरुद्ध इंग्लंड संघाच्या सामन्यावेळी पाऊस पडल्याने सामना थांबवावा लागल्यास रात्री उशिरापर्यंत तो सुरु राहण्याची शक्यता आहे. पण भारत आणि इंग्लंड संघामध्ये उपांत्य फेरीचा सामना न झाल्यास दोन्ही संघांना एक-एक पॉइंट मिळणार आहे. यामुळे भारतीय संघ थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे. दरम्यान, आयसीसीने स्पष्ट केलेय की, उपांत्य अथवा फायनलच्या सामन्यावेळी पाऊस पडल्यास संघाला 10 ओव्हरचा सामना खेळावा लागणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील खेळाडू
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह और अर्शदीप सिंह.
इंग्लंड : इंग्लैंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार और विकेटकीपर), जॉनी बेयरस्टो, हैरी ब्रूक, मोइन अली, लियाम लिविंगस्टोन, सैम करन, क्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, रीस टॉप्ली.
आणखी वाचा :