भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

LK Advani Health Update : 96 वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली गेली आहे. यामुळे अडवाणी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या दीर्घकाळापासून अडवाणी आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत आहेत.

LK Advani Health Update : भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी उप-पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अडवाणी यांना आरोग्यासंबंधित समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अडवाणी यांच्यावर जिरियाट्रिक डिपार्टमेंटमधील डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे.

खरंतर, 96 वर्षीय लालकृष्ण अडवाणी गेल्या काही काळापासून आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत आहेत. यामुळेच अडवाणी यांची घरीच वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात होती. बुधवारी (26 जून) संध्याकाळी अडवाणी यांना आरोग्यासंबंधित त्रास होऊ लागल्याने तातडीने एम्स रुग्णालात नेण्यात आले. सध्या लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जातेय.

अनेक पुरस्कारांनी अडवाणींचा सन्मान
लालकृष्ण अडवाणी यांना यंदाच्या वर्षी देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान भारत रत्नने गौरवण्यात आले होते. अडवाणी यांची प्रकृती वेळोवेळी ठणठीत नसल्याच्या कारणास्तव राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना अडवाणी यांना उपस्थिती लावता आली नाही. यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 30 मार्चला अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. औपचारिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षणमंतरी राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या परिवारातील मंडळींनी उपस्थिती लावली होती.

वर्ष 2015 मध्ये पद्म विभूषण पुस्कार मिळाला
वर्ष 2015 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वाधिक दुसरा मोठा नागरिक सन्मान पद्म विभूषणने गौरवण्यात आले होते. लालकृष्ण अडवाणी वर्ष 2002 ते 2004 पर्यंत भारताचे उप-पंतप्रधान होते. ते भारतीय जनता पक्षाच्या सह-संस्थापकांपैकी एक आणि राष्ट्रीय स्वयंसेवकचे सदस्य आहेत. लालकृष्ण अडवाणी वर्ष 1998 ते 2004 पर्यंत दीर्घकाळ राहिलेले गृहमंत्री आहेत.

वयाच्या 14 व्या वर्षी RSS मध्ये सहभागी
राजकीय करियरदरम्यान लालकृष्ण अडवामी यांना काही महत्वपूर्ण पदांवर काम करण्याची जबाबदारी मिळाली आहे. वर्ष 1941 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी अडवाणी आरएसएसमध्ये सहभागी झाले आणि राजस्थानच्या प्रचारकाच्या रुपात काम केले. वर्ष 1951 मध्ये अडवाणी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या भारतीय जनसंघाचे सदस्य झाले आणि संसदेच्या प्रकरणात प्रभारी, महासचिव आणि दिल्ली युनिटचे अध्यक्षांसह वेगवेगळ्या पदांवर काम केले. याशिवाय अडवाणी यांनी वर्ष 1980 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत भाजपाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि तीन वेळा पक्षाच्या अध्यक्ष रुपात काम केले होते. वर्ष 1989 मध्ये पहिल्यांदा अडवाणी लोकसभेत निवडून आले होते. 
 

आणखी वाचा : 

पत्नी सुनीता आरोप - "अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका होऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नशील"

अरविंद केजरीवाल अडचणीत, CBI पोहोचली ट्रायल कोर्ट, सुनावणी सुरू

Share this article