SIR Protest | संजय राऊतांचा मोदींना राजीनाम्याचा इशारा

SIR Protest | संजय राऊतांचा मोदींना राजीनाम्याचा इशारा

Published : Oct 13, 2026, 07:02 PM IST

दिल्लीत संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या आंदोलनाबाबत पत्रकार परिषद घेतली. SIR, ईव्हीएम, मतदारांची नावं वगळणं आणि ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधातील याचिकांमधील त्रुटी दुरुस्त केल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. जंतर-मंतरवरील आंदोलन रोखल्याबद्दल मोदी-शाहांवर टीका करत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. आंदोलकांवरील गुन्ह्यांना घाबरणार नसल्याचा इशारा दिला. राहुल गांधींसोबतच्या बैठकीत पुढील दिशा ठरणार असल्याचं सांगितलं. शिवसेना प्रकरणाच्या सुनावणीबाबत समाधान व्यक्त करत महागाईवरही केंद्र सरकारला लक्ष्य केलं.