Sikkim Flash Foods : सिक्किममध्ये ढगफुटीमुळे हाहाकार! पुरात लष्कराचे 23 जवान बेपत्ता

Sikkim Flash Foods News : सिक्किममध्ये ढगफुटी झाल्याने हाहाकार उडाला आहे. तीस्ता नदीला पूर आल्याने स्थानिकांवर नैसर्गिक संकट ओढावले आहे. पुरात बेपत्ता झालेल्या लष्कराच्या जवानांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळी सुरू करण्यात आली आहे.

Harshada Shirsekar | Published : Oct 4, 2023 6:32 AM IST / Updated: Dec 26 2023, 11:51 AM IST

Sikkim Flash Foods News : उत्तर सिक्किममध्ये (Sikkim Flash Foods Updates) झालेल्या ढगफुटीमुळे (Cloudburst At Sikkim) मोठी दुर्घटना घडली आहे. ल्होनक सरोवर परिसरात ढगफुटी झाल्याने लाचेन घाटात तीस्ता नदीला (Teesta River Flash Flood) पूर आला. या नैसर्गिक आपत्तीत लष्कराचे 23 जवान (23 Army Personnel Missing) देखील बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेले जवान पुरामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या जवानांचा शोध युद्धपातळी सुरू करण्यात आला आहे.

दुसरीकडे कित्येकांची घरे आणि वाहने चिखलात बुडाली आहेत. मुसळधार पाऊस व पुरामुळे सिक्किममधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे परिसरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

लष्कराची वाहने पुरात गेली वाहून

सिंगतामजवळील बारडांग येथे लष्कराची वाहने उभी करण्यात आली होती. ढगफुटीमुळे आलेल्या पुरात ही वाहने वाहून गेली. वाहनांमध्ये जवळपास 23 जवान होते, अशी माहिती आहे. पुरामुळे लाचेन खोऱ्यातील लष्कराच्या अनेक इमारतींचेही नुकसान झाले आहे.

तीस्ता नदीवर बांधलेला सिंगथम पूल गेला वाहून

तीस्ता नदीवर बांधलेला सिंगथम पूल पुरामुळे वाहून गेला आहे. राष्ट्रीय महामार्ग 10 चे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महामार्गामुळे सिक्किम आणि पश्चिम बंगाल राज्य एकमेकांना जोडले जातात. पण महामार्गाचे नुकसान झाल्याने सिक्किमचा पश्चिम बंगाल राज्याशी संपर्क तुटला आहे.

सिक्किम सरकारकडून हाय अलर्ट जारी 

नैसर्गिक आपत्तीमुळे सिक्किम सरकारने राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. तीस्ता नदी परिसरापासून दूर राहण्याचे स्थानिकांना आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तीस्ता नदीच्या खालील भागात येणाऱ्या पाणलोट क्षेत्रातून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा :

ऐकावे ते नवलच! बंगळुरूमध्ये बस स्टॉप गेलं चोरीला, बांधकामासाठी 10 लाख रुपये झाला होता खर्च

Girlfriend Murder Case : माथेफिरू प्रियकर! गर्लफ्रेंडची हत्या करून बॉयफ्रेंडनं स्वतःच्या गळ्यावरही केला वार, कारण...

इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का?

Share this article