संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, Exit Polls वर BJP विजयाचा दावा | Sanjay Shirsath | EVM Controversy

संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, Exit Polls वर BJP विजयाचा दावा | Sanjay Shirsath | EVM Controversy

Published : May 01, 2026, 04:03 PM IST

छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री संजय शिरसाट यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. Exit Polls नुसार अनेक राज्यांत भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या आरोपांवर बोलताना EVM आणि निवडणूक आयोगावर केलेले आरोप फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मराठी भाषा मुद्द्यावर ऑटो चालकांनी मराठी शिकावी यावर भर देत सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जनगणना प्रक्रियेबाबत स्वगणना आणि त्यानंतर होणाऱ्या पडताळणीबाबत माहिती दिली. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमी दरामुळे भेडसावणाऱ्या अडचणींचाही त्यांनी उल्लेख केला.