शायना एनसी यांनी पुण्यात एका तरुणाने रील बनवल्यानंतर त्याचे तोंड काळे करून, चप्पल डोक्यावर ठेवून उठाबशा काढायला लावल्याच्या घटनेवरून मनसेवर टीका केली. हा प्रकार ‘मनसेची तालिबानी स्टाईल’ आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अशा गुंडगिरीला सार्वजनिक जीवनात स्थान नसल्याचे म्हटले. संबंधित तरुणाच्या परत येण्याची 15 दिवस वाट पाहून त्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करण्यात आल्याचा दावा करत पुणे पोलिसांनी FIR दाखल करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. राहुल गांधींवरही शायना एनसी यांनी टीका केली. पंतप्रधानांच्या दिवंगत आई हीराबेन यांची खिल्ली उडवणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधींना ‘इमॅच्युअर कॉमेडियन’ म्हटले आणि स्टँड-अप कॉमेडियन व्हायचे असेल तर राजकारणाऐवजी व्यवसाय बदलण्याचा सल्ला दिला. SIR बाबत बोलताना त्यांनी ही प्रक्रिया ‘डिलीशन’ नसून ‘डिटेक्शन’ असल्याचे म्हटले. 97 लाख मतदारांपैकी 33 लाख मतदारांना नोटीस मिळाल्याचा उल्लेख करत अंतिम मतदार यादीसाठी पडताळणी आवश्यक असल्यास SIR आपले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापूर्वीची यादी 2002 मध्ये झाली होती आणि 24 वर्षांनंतर होणाऱ्या अद्ययावतीकरणाचे स्वागत केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.