Ram Mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारी (2024) रोजी पार पडणार आहे. अशातच आता मुंबईवरुन एक तरूणी अयोध्येपर्यंत रामललांच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत आहे.
Shabnam Shaikh Mumbai Viral Story : रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. रामललांच्या दर्शनासाठी भाविकही फार उत्सुक आहेत. अशातच आता मुंबईतील एक तरूणी चक्क अयोध्येपर्यंत रामललांच्या दर्शनासाठी पायी चालत जात आहे. शबनम शेख (Shabnam Shaikh) असे तरूणीचे नाव आहे.
शबनम शेख ही मुंबईत राहणारी असून तिच्यासोबत अयोध्येपर्यंतच्या पायी प्रवासात तिचे दोन सहकारी रमन राज शर्मा आणि विनीत पांडे साथ देत आहेत. शबनम तिच्या अयोध्येपर्यंतच्या प्रवासाबद्दल म्हणते की, "रामलला हे एखाद्या विशेष धर्माचे नसून संपूर्ण मानव समाजाचे आहेत."
रामभक्तासाठी हिंदू असणे गरजेचे नाही
शबनम शेख ही मुस्लिम तरूणी असून तिचा रामललांवर खूप विश्वास आहे. शबनम म्हणते की, "श्रीरामांची पूजा करण्यासाठी हिंदू असणे गरजेचे नाही. कोणताही व्यक्ती त्यांची पूजा करू शकतो." शबनमच्या या विचारांमुळेच ती सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
शबनम आपल्या सहकाऱ्यांसोबत दररोज 25-30 किलोमीटर अंतर पायी चालते. शबनमला तिच्या अयोध्येतील प्रवासात पोलिसांकडूनही सहकार्य मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चाहती
शबनम ही रामललांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही मोठी चाहती आहे. शबनम पंतप्रधानांबद्दल म्हणते की, नरेंद्र मोदी सातत्याने देशातील नागरिकांना स्वच्छता आणि पर्यावरणाबद्दल जागृक करत आहेत. तरूणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय आहे. यामुळे मी देखील पंतप्रधानांना सातत्याने फॉलो करते.
आणखी वाचा:
अयोध्येतील विमानतळाचे PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी 84 सेकंदाचा शुभ मुहूर्त या कारणास्तव आहे खास