India

Ayodhya

अयोध्येतील विमानतळाचे PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Image credits: Our own

अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळ

अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी पंतप्रधान 30 डिसेंबर, 2023 रोजी अयोध्येत येणार आहेत.

Image credits: Our own

महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ

अयोध्येत तयार करण्यात आलेल्या विमानतळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आले आहे.

Image credits: Our own

विमान उड्डाणे

अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 6 जानेवारी, 2024 पासून विमान उड्डाणे सुरू केली जाणार आहेत.

Image credits: Our own

विमान उड्डाणाची ठिकाणे

अयोध्येतून सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू सारख्या प्रमुख शहरांसाठी उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे.

Image credits: Our own

821 एकर जमिनीवर विस्तारलेय विमानतळ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 821 एकर जमिनीवर विस्तारल्याची माहिती दिली आहे.

Image credits: Our own

विमानतळाचा पहिला टप्पा

विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात 65 हजार स्क्वेअर फूटचे टर्मिनल उभारले जाणार आहे. विमानाचा रनवे 2 हजार 200 मीटर रुंद असणार आहे. याशिवाय प्रतितास दोन-तीन विमान उड्डाण करू शकतात.

Image credits: Our own

रेल्वे स्थानक

नूतनीकरण करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले आहे. हे रेल्वे स्थानक 430 कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आले आहे.

Image credits: Twitter

रामललांची प्राणप्रतिष्ठा

22 जानेवारी, 2024 रोजी रामललांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी आठ हजारांच्या आसपास व्हीव्हीआयपी उपस्थितीत राहू शकतात.

Image credits: Our own