दिल्लीतील शाळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. ईस्ट ऑफ कैलास डीपीएस, सलवान स्कूल आणि केंब्रिज स्कूल या शाळांना धमक्या मिळाल्या असून, शाळेच्या परिसरात स्फोटके असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील अनेक शाळांना पुन्हा एकदा धमक्या आल्या आहेत. शुक्रवारी, १३ डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतील तीन शाळांना एकाच वेळी धमकीचा फोन आला होता, ज्यामध्ये शाळेच्या परिसरात स्फोटके असल्याचे सांगण्यात आले होते. पहाटे ४.३० वाजता पहिला कॉल आला, त्यानंतर दिल्ली पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. मात्र, आतापर्यंत तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही.
ज्या शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत त्यामध्ये ईस्ट ऑफ कैलास डीपीएस, सलवान स्कूल आणि केंब्रिज स्कूलचा समावेश आहे. धमकीमध्ये म्हटले आहे, तुमच्या शाळेच्या परिसरात अनेक ठिकाणी स्फोटके पेरण्यात आली असल्याची माहिती देण्यासाठी हा ई-मेल आहे. इमारती आणि लोकांचे नुकसान करण्यासाठी हे बॉम्ब पुरेसे आहेत. पुढे असे सांगण्यात आले की ज्या शाळांना धोका होता त्यापैकी एक शाळा आपल्या क्रीडा दिनाची तयारी करत होती, ज्यामध्ये विद्यार्थी मैदानात जमतात.
याआधी ८ डिसेंबर रोजी दिल्लीतील ४० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. रात्री ११.३० च्या सुमारास ईमेल प्राप्त झाला, ज्यामध्ये आरकेपुरममधील डीपीएस स्कूलशिवाय पश्चिम विहारमधील जीडी गोएंका शाळेचेही नाव होते. या शाळांमध्ये बॉम्ब पेरण्यात आल्याचे धमकीपत्रात म्हटले आहे. मेल पाठवणाऱ्याने स्फोट थांबवण्याच्या बदल्यात ३० हजार डॉलर्सची मागणी केली होती.
अलीकडेच दिल्लीतील दोन भागात वेगवेगळ्या वेळी कमी तीव्रतेचे स्फोट झाले आहेत. दोन महिन्यांत दोन स्फोट आणि सततच्या धमक्यांमुळे राजधानीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २० ऑक्टोबर २०२४ रोजी रोहिणी भागात सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट झाला होता. यानंतर पुढचा स्फोट नोव्हेंबरच्या अखेरीस प्रशांत विहारमध्ये झाला. दोन्ही ठिकाणाहून पांढऱ्या पावडरसारखा पदार्थ आढळून आला. मात्र, लोकांना घाबरवण्याचा हा कट असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
आणखी वाचा-