रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल रशियन भाषेत आला आहे. ही धमकी आरबीआय गव्हर्नरच्या मेल आयडीवर आली असून, याप्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : दिल्लीच्या शाळांनंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला शुक्रवार १३ डिसेंबर रोजी रशियन भाषेत लिहिलेला मेल आला, ज्यामध्ये बँकेचे मुंबई कॅम्पस स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआय गव्हर्नरच्या मेल आयडीवर रशियन भाषेतील ई-मेल आला आहे. याप्रकरणी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. भारतीय रिजर्व बैंक धमकी मिळण्याची ही दुसरी घटना आहे.
नोव्हेंबरमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा विभागाला धमकीचा फोन आला होता. सकाळी दहाच्या सुमारास रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर हा कॉल करण्यात आला. फोन केलेल्या व्यक्तीने आपण लष्कर-ए-तैयबाचा सीईओ असल्याचे सांगितले होते. मात्र, धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागचा रस्ता बंद करा, इलेक्ट्रिक कार खराब झाल्याचे सांगून कॉल डिस्कनेक्ट केला.
१३ डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतील तीन शाळांना बॉम्बची धमकी मिळाली. ईस्ट ऑफ कैलास डीपीएस, सलवान स्कूल आणि केंब्रिज स्कूल अशी शाळांची नावे आहेत. धमकी देणाऱ्या ई-मेलमध्ये म्हटले आहे, तुमच्या शाळेच्या परिसरात अनेक ठिकाणी स्फोटके पेरण्यात आली आहेत. इमारती आणि लोकांचे नुकसान करण्यासाठी हे बॉम्ब पुरेसे आहेत. याआधी ८ डिसेंबरच्या रात्रीही दिल्लीतील ४० हून अधिक शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. मेल पाठवणाऱ्याने स्फोट थांबवण्याच्या बदल्यात ३० हजार डॉलर्सची मागणी केली होती.
आणखी वाचा-