
घाटी रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी रुग्णालयातील कामकाजावर गंभीर नाराजी व्यक्त केली. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही अपेक्षित सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. १४ कोटी रुपयांच्या कामात समाधानकारक प्रगती नसल्याचे सांगत संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. बोगस कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावरही प्रतिक्रिया देत शिवसेना खासदारांवरील निर्णय अपेक्षित असल्याचे म्हटले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावर, राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर आणि इतर घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले.