Pradip Purnekar | ठाण्याचा आयुक्त पालकमंत्र्यांचा घरगडी, मुख्यमंत्रीसाहेब राजीनामा द्या - संजय राऊत

Pradip Purnekar | ठाण्याचा आयुक्त पालकमंत्र्यांचा घरगडी, मुख्यमंत्रीसाहेब राजीनामा द्या - संजय राऊत

Published : Sep 30, 2026, 04:00 PM IST

ठाण्यात शिवसेना (UBT) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या फायरिंगनंतर संजय राऊत यांनी ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून राज्य सरकार, गृहखाते आणि ठाणे पोलिसांवर आरोप केले. प्रदीप पूर्णेकर हे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानणारे निष्ठावंत शिवसैनिक होते, असे सांगत राऊत यांनी ठाण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचा दावा केला. पूर्णेकर यांचा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याशी राजकीय संघर्ष होता, तसेच मनोरमा नगरमधील क्लस्टर, बिल्डर लॉबी आणि ड्रग्स रॅकेटविरोधात ते लढत होते, असा दावा राऊत यांनी केला. या प्रकरणातील खऱ्या सूत्रधारांना अटक करण्याची मागणी करत त्यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांवरही आरोप केले. “आयुक्त पालकमंत्र्यांचा घरगडी आहे” असा आरोप करत आयुक्तांना तातडीने हटवण्याची मागणी राऊत यांनी केली. तसेच गृहखात्याच्या कारभारावर टीका करत देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी त्यांनी केली. राऊत यांच्या या आरोपांदरम्यान पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.