ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशीदी यांनी मुलांच्या संख्येबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. हिंदूंनी अधिक मुलांना जन्म देण्याच्या काही संघटनांच्या आवाहनावर बोलताना रशीदी यांनी, “किमान 10 मुलं जन्माला घाला, आमच्या बरोबरीला तरी या,” असे म्हटले. मुस्लिम कुटुंबांमध्ये पाचपेक्षा अधिक मुले असतात आणि काही कुटुंबांमध्ये ही संख्या 10, 11 किंवा 12 पर्यंत असल्याचा दावा त्यांनी केला. मुलांचे पालनपोषण, शिक्षण आणि वृद्धापकाळात आई-वडिलांची काळजी घेण्याबाबतही त्यांनी हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांची तुलना केली. इस्लाममध्ये मुलांच्या जन्मावर रोक लावता येत नाही, असेही रशीदी यांनी म्हटले.