Marathi for Taxi Driver  मराठी न बोलणारे टॅक्सी ड्रायव्हर्स आरटीओकडून शोध सुरु, 1 महिन्याची नोटीस

Marathi for Taxi Driver मराठी न बोलणारे टॅक्सी ड्रायव्हर्स आरटीओकडून शोध सुरु, 1 महिन्याची नोटीस

Published : Aug 20, 2026, 07:06 PM IST

महाराष्ट्रातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आले आहे. मराठी न येणाऱ्या चालकांसाठी राज्य सरकारने मे महिन्यापासून मोफत मराठी भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. मात्र, अद्याप 60 टक्क्यांहून अधिक चालकांनी या वर्गांना हजेरी लावलेली नसल्याचे सांगण्यात आले. आता मराठी न शिकलेल्या चालकांना नोटीस देऊन सरकारने निश्चित केलेल्या केंद्रांवर एका महिन्याच्या आत मराठी शिकण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतरही मराठी न शिकल्यास चालकांचा परवाना निलंबित केला जाईल आणि तीन महिन्यांनंतरही नियमांचे पालन न केल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई होईल. प्रवासी आणि चालकांमध्ये संवाद व्यवस्थित व्हावा आणि व्यवहारात गैरसमज निर्माण होऊ नयेत, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही दंडात्मक कारवाई नसून महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार असलेली आवश्यकता आहे. चालकांसाठी मराठीचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असल्याचेही सांगण्यात आले.

02:17Manoj Jarange | मुंबईला निघताना कुटुंबासमोर मनोज जरांगे भावुक | Maratha Andolan
09:39Manoj Jarange | मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं सहकार्याचं आवाहन Eknath Shinde on Jarange
03:36मुंबईसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवालीतून रवाना | Manoj Jarange | Maratha Protest
03:23Manoj Jarange | जरांगे अंतरवलीतून निघताच मुख्यमंत्र्यांची पहिलीच प्रतिक्रिया fadanvis on jarange
04:32Chandrashekhar Bawankule | 18 जिल्ह्यांच्या दुष्काळावर चंद्रशेखर बावनकुळे | Disha Salian Case
08:15Land Titling Act | A to Z information | निश्चित प्रॉपर्टी कार्डसाठी महत्त्वाचा कायदा | pune | mumbai
07:07MPSC EXAM चे आता असेल वेळापत्रक, गैरप्रकार रोखणार बळकटी आणणार PUNE
05:23Eknath Shinde London Visit | लंडन दौऱ्यावर एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं? | Virat Kohli
05:27लंडनमध्ये विराट कोहलींची एकनाथ शिंदेंशी भेट | Virat Kohli | Eknath Shinde
04:40Marbat Festival | मारबत उत्सवात देवेंद्र फडणवीस, उमेश यादव | Maharashtra Culture