शरिया कायद्याबद्दल चिंता असून तो अमेरिकेतील लोकांवर लादला जाण्याची भीती वाटतेय, रीप चिप रॉय यांचे भाषण झाले व्हायरल

Published : May 10, 2024, 11:46 AM ISTUpdated : May 10, 2024, 12:13 PM IST
Ref. Chip Roy

सार

अमेरिकन हाऊसमध्ये रेप चिप रॉय यांचे भाषण झाले. या भाषणामध्ये त्यांनी शरिया कायद्याच्या वाढत जाणाऱ्या प्रभावाबाबत भीती व्यक्त केली आहे. 

अमेरिकन हाऊसमध्ये झालेल्या भाषणाच्या दरम्यान रेप चिप रॉय यांनी अमेरिकन समाजाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी शरिया कायद्याच्या वाढत जाणाऱ्या प्रभावाबाबत भीती व्यक्त केली आहे. रॉय यांनी बोलताना म्हटले आहे की, "मला शरिया कायद्याबद्दल काही तीव्र चिंता वाटत आहेत. अमेरिकन लोकांवर त्यांच्या संभाव्य भीती लादण्याबद्दलच्या भीतीवर प्रकाश टाकला आहे. 

इस्राइलचा विनाश पाहणाऱ्यांबद्दल चिंता - 
त्यांनी बोलताना इंग्लंडमध्ये इस्राइल देशाच्या शत्रुंना पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली आहे. जे लोक इस्राइलचा विनाश पाहू इच्छितात त्यांच्याबद्दल यावेळी रॉय यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हमासने इस्राइलवर प्राणघातक हल्ला केला त्यादिवशी सोशल मीडियावर केलेल्या टीकेमुळे अली हे चर्चेत आले होते. रॉय यांनी वेगवेगळ्या कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या टीका टिप्पणीमुळे चिंता व्यक्त केली आहे. 

रॉय यांनी दक्षिणेकडील सीमा बंद करण्याची वकिली करणारे काँग्रेससागे सदस्य म्हणून उदयाला आले होते. अमेरिकेमध्ये जन्मलेल्या अनिवासी लोकांची संख्या जास्त असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला होता. रॉय पुढे म्हणतात की, "लंडनमध्ये काय चालले आहे याकडे लोकांचे लक्ष नाही का? येथे इंग्लंडमध्ये मुस्लिम लोकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यांना शरिया कायदा लागू करायचा आहे. अमेरिकेच्या इतिहासात सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या येथे जन्मली असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे." त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्या देशामध्ये हाहाकार उडाला आहे. 
आणखी वाचा - 
शरिया कायद्याबद्दल चिंता असून तो अमेरिकेतील लोकांवर लादला जाण्याची भीती वाटतेय, रीप चिप रॉय यांचे भाषण झाले व्हायरल
केदारनाथच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह, मंदिराचे दरवाजे खुले करतानाचा पाहा पहिला VIDEO

PREV

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!