Rameshwarm Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणात NIA ची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीसह बंगळुरुमधील तीन जणांना घेतले ताब्यात

बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमधील स्फोटाप्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेकडून सातत्याने तपास केला जात आहे. अशाच संस्थेने बंगळुरु, मुंबईसह दिल्लीतून तीन जणाना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे.

Rameshwarm Cafe Blast : बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात नऊ जण जखमी झाले होते. या प्रकरणात सातत्याने राष्ट्रीय तपास संस्थेकडून तपास केला जात आहे. अशाचच संस्थेने बंगळुरु, मुंबईसह दिल्लीतून तीन जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे. रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेने ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे मिनाज उर्फ सुलेमान, सैयद समीर आणि अनज़ इकबाल शेख आणि शान रहमान अशी आहेत.

दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्ती ISIS मॉड्यूल प्रकरणासंबंधित आहेत. याशिवाय राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी 18 डिसेंबरला समीर याला दिल्लीत अटक केली होती. तर रहमानला जबलपूरमधून ताब्यात घेतले होते. ताब्यात घेण्यात आलेले चारहीजण परप्पा येथील अग्रहारा तुरुंगात बंद आहेत. पण बल्लारी ISIS मॉड्यूलमधील पाचवा संशयित अद्याप फरार आहे.

काय आहे ISIS बल्लारी मॉड्यूल?
14 डिसेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर ISIS बल्लारी मॉड्यूलचा अधिक तपास सुरू झाला. राष्ट्रीय तपास संस्थेने देशातील चार राज्यांमध्ये छापेमारी केल्याने आठ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आले. या व्यक्तींना रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटासह दहशतवादी हालचालींमध्ये कथित रुपात सहभाग असल्याच्या संशयाखाली अटक करण्यात आली आहे.

छापेमारीदरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आयईडी (IED) स्फोटक तयार करण्यासाठी लागणारे सामान जप्त केले. अटक करण्यातत आलेला व्यक्ती मिनाज उर्फ सुलेमान ISIS बल्लारी मॉड्यूलमधील एक प्रमुख व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे. 

आणखी वाचा :

Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्याची माहिती देणाऱ्याला मिळणार 10 लाख रुपयांचे बक्षीस, NIA ने केली घोषणा

जम्मू काश्मीरमधील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता याना मीरने UK संसदेत दिले धडाकेबाज भाषण (Watch Video)

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला किती जागांवर मिळणार विजय? प्रशांत किशोर यांनी केली भविष्यवाणी

Share this article