काय सांगता! चक्क राम मंदिराच्या थीमवर आधारित तयार केलाय नेकलेस, पाहा VIDEO

Ram Mandir Ceremony : 22 जानेवारी, 2024 रोजी अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधानांसह काही व्हीव्हीआयपी येणार आहेत. 

Ram Mandir Theme Necklace : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरदार सुरू आहे. 22 जानेवारी, 2024 रोजी राम जन्मभूमी येथे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. याचदरम्यान, गुजरातमधील सूरत (Surat) येथील एका हिरा व्यापाऱ्याने एक सुंदर नेकलेस तयार केला आहे. हा नेकलेस राम मंदिराच्या थीमवर आधारित असून याची सध्या खूप चर्चा सुरू आहे.

राम मंदिरावराच्या थीमवर आधारित नेकलेस
राम मंदिराच्या थीमवर बनवण्यात आलेला नेकलेस खास आहे. या नेकलेससाठी पाच हजार अमेरिकन हिरे (American Diamond) आणि दोन किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय नेकलेस तयार करण्यासाठी 40 कारागिरांची मदत घेण्यात आली आहे.

रशेस ज्वेल्सचे संचालक कौशिक काकाडिया यांनी या नेकलेसबद्दल अधिक माहिती दिली आहे. काकाडिया यांनी म्हटले की, "आम्ही अयोध्येत तयार करण्यात येणाऱ्या राम मंदिरापासून प्रेरित होऊन नेकलेस तयार करण्यास सुरूवात केली. हा नेकलेस एखाद्या व्यावसायिक उद्देशासाठी नसून राम मंदिराला भेट दिला जाणार आहे. या नेकलेसवर रामायणातील मुख्य पात्रं कोरण्यात आलेली आहेत."

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी व्हीव्हीआयपी येणार आहेत. याशिवाय कार्यक्रमासाठी लाखोच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. तसेच राम मंदिराच्या पुजाऱ्यांचीही निवड करण्यात आली आहे.

अयोध्या राम मंदिराचे पुजारी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील विद्यार्थी मोहित पांडे यांची अयोध्येतील राम मंदिराचे पुजारी म्हणून निवड करण्यात आली आहे. मोहित हे दूधेश्वर वेद विद्यापीठाचे विद्यार्थी असून त्यांना तीन हजार लोकांच्या मुलाखतीतून निवडण्यात आले आहे. मोहित यांच्यासह 50 पुजाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्ती करण्याआधी त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

आणखी वाचा: 

भगवान रामाच्या या मंदिरांना नक्की भेट द्या

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी तमिळनाडू-पाँडिचेरीतील नागरिकांचे अयोध्येत केले जाणार स्वागत

Ram Mandir Ceremony : भाविकांना लवकरच रामललांचे करता येणार दर्शन, पण या गोष्टींचे करावे लागणार पालन

Read more Articles on
Share this article