Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी तमिळनाडू-पाँडिचेरीतील नागरिकांचे अयोध्येत केले जाणार स्वागत

Ayodhya : श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधी तमिळनाडू आणि पाँडिचेरी येथून 12 हजारांहून अधिक नागरिक अयोध्येत येणार आहेत. आयआरसीटीसी (IRCTC) आणि पर्यटन विभागाकडून अयोध्येत या लोकांचे स्वागत केले जाणार आहे.

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याआधी तमिळनाडू (Tamil Nadu) आणि पाँडिचेरी येथील नागरिक अयोध्येत येणार आहेत. इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) आणि पर्यटन विभागाकडून त्यांच्या स्वागताची तयारी केली जात आहे. 

दक्षिण भारतातील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऐतिसाहिक आणि आध्यात्मिक ठिकाणी भेट देतील. याशिवाय आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित लोकांशीही संवाद साधतील.

17 ते 31 डिसेंबर, 2023  पर्यंत करणार दौरा

1 हजारहून अधिक प्रवासी येणार
नवनीत गोयल यांनी सांगितले की, 216 नागरिकांचा ग्रुप काशी तमिळ संगम अंतर्गत येणार आहे. 1 हजाराहून अधिक नागरिक उत्तर प्रदेशातील वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्येचा दौरा करणार आहेत. सर्व प्रवासी हे वारासणीला बसच्या माध्यमातून येणार आहेत.

राहाण्याची आणि भोजनाची व्यवस्था
अयोध्येचे पर्यटन अधिकारी आरपी यादव म्हणतात की, दक्षिण भारतातून आलेल्या प्रवाशांचे बस स्थानकात फुलांचे हार घालून स्वागत केले जाणार आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमासह त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची देखील व्यवस्था केली जाणार आहे.

आणखी वाचा: 

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या सोहळ्यासाठी अयोध्येतील हॉटेलच्या किंमतीत दहापट वाढ

Ram Mandir Ceremony : भाविकांना लवकरच रामललांचे करता येणार दर्शन, पण या गोष्टींचे करावे लागणार पालन

Ram Mandir : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जगभरातून येणाऱ्या भाविकांना Google रामनगरीत पोहोचवण्याचे करणार काम

Read more Articles on
Share this article