20 किलो Parle G बिस्किटांचा वापर करुन साकारण्यात आलेय राम मंदिर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Published : Jan 18, 2024, 12:59 PM ISTUpdated : Jan 18, 2024, 01:18 PM IST
Ayodhya-Ram-Mandir-replica-made-by-20-kg-Parle-g-biscuit

सार

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच सोशल मीडियावर बिस्किटांपासून राम मंदिराची प्रतिकृती साकारल्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Ram Mandir Pran Prathishtha :  राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशातच देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार आपल्या कलेने राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करत आहेत.

याआधी राम मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कात राम मंदराची प्रतिकृती साकारल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता पार्ले-जी (Parle G) बिस्किटांपासून राम मंदिर तयार करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पार्ले जी बिस्किटांपासून तयार करण्यात आलेल्या राम मंदिराच्या प्रतिकृतीचा व्हिडीओ लाखो नागरिकांनी पसंत केला आहे.

20 किलो पार्ले-जी बिस्किटांचा करण्यात आलाय वापर
सोशल मीडियावर पार्ले-जी बिस्किटांपासून तयार करण्यात आलेल्या राम मंदिराच्या प्रतिकृतीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील व्यक्ती पार्ले-जी बिस्किटांपासून राम मंदिराची प्रतिकृती साकारताना दिसतोय. खरंतर मंदिराची प्रतिकृती साकारण्यासाठी व्यक्तीने 20 किलो पार्ले-जी बिस्किटांचा वापर केल्याचे सांगितले जात आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
पार्ले-जी बिस्किटांपासून तयार करण्यात आलेल्या राम मंदिराच्या प्रतिकृतीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर 58 लाख युजर्सने पसंत केला आहे. याशिवाय व्हिडीओमधील कलाकाराच्या कौशल्याचेही कौतुक नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह व्हीव्हीआयपी उपस्थितीत राहणार आहेत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनसाठी खुले करण्यात येणार आहे.

आणखी वाचा: 

काय सांगता! चक्क राम मंदिराच्या थीमवर आधारित तयार केलाय नेकलेस, पाहा VIDEO

Ram Mandir Pran Pratishtha : रामललांची मूर्ती मंदिर परिसरात दाखल, या दिवशी गाभाऱ्यात होणार स्थापना

अयोध्येत उभारणार 7 स्टार Vegetarian Retreat, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची घोषणा

PREV

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!