Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्री राम मंदिरातील रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. सोहळ्यास उपस्थिती दर्शवण्यापूर्वी पंतप्रधान मोदी सर्व वैदिक परंपरांचे पालन करतील.
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात मंगळवारपासून (16 जानेवारी 2024) झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आता 22 जानेवारीपर्यंत केवळ फलाहार करतील. तसेच झोपण्यासाठी केवळ घोंगडी आणि लाकडी बाज यांचाच वापर करतील.
श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे कसे असेल अनुष्ठान?
श्री राम मंदिरातील रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) होणाऱ्या वैदिक अनुष्ठानास डॉ अनिल मिश्र यांच्या हस्ते सुरुवात होईल. डॉ. अनिल मिश्र हे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आहेत. यामध्ये रामलला यांच्या मूर्तीस 10 वेगवेगळ्या पद्धतींनी स्नान घालण्यात येईल. नवग्रह कुंडमध्ये यज्ञ आणि हवन केले जाईल.
पुजारी सुनील दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये जवळपास दीडशे विद्वान मंडळी सहभागी होतील. 16 जानेवारीपासून सुरू झालेली पूजाविधि 22 जानेवारी संध्याकाळपर्यंत चालणार आहेत. विष्णूपूजन, गोदान देखील केले जाईल. यानंतर मूर्ती स्वच्छ करून मंदिरामध्ये नेण्यात येईल”.
पंतप्रधान नरेंद्र मोदी करताहेत या नियमांचे पालन
यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे (Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Trust) प्रथा- परंपरेबाबत विचारणा करून संपूर्ण माहिती मागवली होती. पंतप्रधान मोदी 11 दिवसांपासून उपवास करून यम नियमांचेही पालन करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, या कार्यक्रमाच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदी पलंगावर झोपणार नाहीत. या काळात ते फलाहार करून उपवास करतील. तसेच झोपण्यासाठी लाकडी बाज आणि घोंगडीचा वापर करतील.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमास (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) सुरुवात झाली आहे. पुढील सात दिवस वेगवेगळ्या पद्धतीने पूजाविधि-परंपरा पार पाडल्या जातील.
आणखी वाचा
Ayodhya Ram Mandir सोन्यासारखे चमकेल श्री राम मंदिर, नवीन फोटो पाहिले?
VIRAL VIDEO : जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थिनीने गायले राम भजन, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
Ram Mandir Pran Pratishta : मॉरिशस सरकारची मोठी घोषणा, 22 जानेवारीला मिळणार 2 तासांची विशेष सुटी
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मौनी बाबा सोडणार मौनव्रत, वयाच्या 10व्या वर्षी केला होता संकल्प