येत्या 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. अशातच पंडित गणेश्वर शास्री दव्रिण यांनी रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठीचा 84 सेकंदाचा मुहूर्त का खास आहे याबद्दल सांगितले आहे.
Ram Mandir Ceremony : अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. विमानतळ ते रस्ते रुंदीकरणासाठीच्या कामांनाही वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुभ मुहूर्तावर रामललांची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
अशातच पंडित गणेश्वर शास्री दव्रिण यांनी प्राणप्रतिष्ठेसाठीचा 84 सेकंदाचा मुहूर्त का खास आहे याबद्दल सांगितले आहे.
पंडितांनी काशी विश्वनाथ कॉरिडोरचाही मुहूर्त काढला होता
पंडित गणेश्वर शास्री दव्रिण यांनी 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराच्या उद्घाटनासाठी दुपारी अभिजीत मुहूर्त काढला आहे. या मुहूर्तादरम्यान रामललांच्या अभिषेकाची वेळ ठरवण्यात आली आहे.
दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी मुहूर्त काढण्यात आला आहे. हा 84 सेकंदांपर्यंतचा मुहूर्त असणार आहे. पंडित गणेश्वर शास्री यांनी 84 सेकंदाला अत्यंत शुभ मानले आहे. याशिवाय शास्री यांनी राम मंदिराच्या शिलान्यास आणि काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या उद्घाटनाचाही मुहूर्त काढला होता.
यासाठी खास आहे मुहूर्त
पंडित गणेश्वर यांनी 84 सेकंदाच्या मुहूर्ताबद्दल म्हटले आहे की, हा मुहूर्त कोणताही दोष निर्माण होईल असा नाही. यामुळेच रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी हा 84 सेकंदाचा मुहूर्त अत्यंत शुभ आहे. राम मंदिराचे उद्घाटन दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 08 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंदांपर्यंत शुभ मुहूर्त असल्याचेही पंडित गणेश्वर यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा:
Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर निर्मितीमुळे रोजगार वाढला, फुल विक्रेत्यांना अच्छे दिन - स्थानिक