राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मुंबईत सांगता होणार आहे. यावेळी महा विकास आघाडीचे देशभरातील नेते उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मुंबईत येऊन संपणार आहे. त्यांनी मणिपारपासून दोन महिन्यांपासून जास्त काळ ६७०० किलोमीटरची पायी यात्रा केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेला देशभरातील मोठे नेते उपस्थित राहणार असून त्यामध्ये एमके स्टॅलिन, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव हे उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय, उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य, शरद पवार आणि झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे देखील लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी ऐक्याचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमात सामील होण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय, उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य, शरद पवार आणि झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे देखील लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी ऐक्याचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमात सामील होण्याची अपेक्षा आहे.
या सभेला आघाडीचे महाराष्ट्रातील लोक उपस्थित राहणार असून सोनिया गांधी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात्रेत सहभागी झालेल्या प्रियांका गांधी या सहभागी होंबार असल्याची माहिती देण्यात येत आहे.प्रियांका गांधी यांनी यावेळी भारत जोडो यात्रेला उपस्थित होते. प्रियांका गांधी यांनी बोलताना सांगितले की, “आज 'भारत जोडो न्याय यात्रा' संपत आहे. इथे येऊन आम्हा दोघांना खूप आनंद होत आहे. तुम्हाला देशाचे वास्तव समजावे म्हणून राहुल गांधीजींनी ही यात्रा केली. हा संपूर्ण प्रवास जनतेला जागरूक करण्यासाठी होता.”
पूर्व-पश्चिम भारत जोडो न्याय यात्रेला 14 जानेवारी रोजी इंफाळ येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि आसाम, पश्चिम बंगाल, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रासह 15 राज्यांमधील 100 हून अधिक लोकसभा मतदारसंघ पार केले आहेत.
आणखी वाचा -
Lok Sabha Election 2024 : देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी BJP ला मोठा धक्का, खासदार अजय प्रताप सिंह यांनी पक्षाला ठोकला रामराम