नोए़डामध्ये आंदोलन करणाऱ्या 700 हून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर नोएडा प्राधिकरणाच्या बाहेर शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन घोषणाबाजी करण्यासह कार्यालयात घुसणार असल्याचे बोलत होते.
Farmers Protest : आपल्या मागण्यांसाठी 18 जानेवारी रोजी नोएडा प्राधिकरण कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या 746 शेतकऱ्यांवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या जेईच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा 23 जानेवारीलाच दाखल केला होता, पण त्याबद्दल गुप्तता ठेवण्यात आली. जवळजवळ एका महिन्यानंतर एफआयआर केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी एफआयआर मागे घेण्याची मागणी केली आहे.
प्राधिकरणाच्या कार्यालयाला टाळे लावण्यासाठी पोहोचले होते शेतकरी
पोलिसांच्या एफआयआरमध्ये भारतीय किसान परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखवीर खलीफा यांच्यासह 700 हून अधिक शेतकऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्राधिकरणाचे कनिष्ठ अभियंता अरुण वर्मा यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले की, 18 जानेवारीला नोएडा प्राधिकरण कार्यालयावर टाळे लावण्यासाठी शेतकरी पोहोचले होते.
700 हून अधिक जण प्राधिकरण कार्यालयाजवळ आले होते. यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश होता. या सर्वांकडून प्राधिकरणाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. आम्ही कार्यालयात घुसणार आणि प्राधिकरणाला टाळे लावणार असेही म्हटले जात होते. यावेळी पोलिसांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत चर्चा करूयात असेही सांगितले होते. तरीही सर्वजणांनी आम्ही चर्चा करणार नसल्याचे म्हटले. याशिवाय आमच्यामध्ये जो येईल त्याला जीवंत सोडणार नाही असेही बोलले जात होते.
प्राधिकरणाच्या गेटवर लावण्यात आलेल्या बॅरियरवर चढले
नोएडा प्राधिकरणाच्या आजूबाजूला कॉलनी, टपरी, चहाची दुकाने इत्यादी कारखान्यांमध्ये काम करून स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीबांना मारहाण करण्यात आली आणि प्राधिकरणाजवळ न येण्यास सांगितले आणि पळून जाण्यास सांगितले.असे सांगितल्यानंतर सुखवीर खलिफा, महेंद्र आणि जयवीर प्रधान असे अनेकजण नोएडा विकास प्राधिकरणाच्या गेट क्रमांक 4 वर लावलेल्या बॅरियरवर चढले.
गेटला टाळे लावण्याचा प्रयत्न करताना फार गदारोळ निर्माण झाल्याने बॅरियर मोडल्याने काहीजण खाली पडले. गेटवर लावण्यात आलेल्या राष्ट्रीय ध्वजाचा त्यावेळी अपमानही झाला. याशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला देखील करण्यात आला.
नोएडा विकास प्राधिकरणारचे कर्मचारी देखील शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे आपला जीव वाचवण्यसाठी आजूबाजूच्या ठिकाणी लपून राहिले. शेतकऱ्यांकडून तोडफोड करण्यात येत असल्याने कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदासह अन्य आर्थिक संस्थांमध्ये काम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आणखी वाचा :
पंजाब-हरियाणातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर,शेतकऱ्यांवर अश्रूधुराचा मारा