SPG कमांडोने सेल्फी घेण्यास रोखले, पण पंतप्रधान मोदींनी मुलांची इच्छा अशी केली पूर्ण

Prime Minister Narendra Modi Selfie : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या दौऱ्यावर असताना लहान मुलांची त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा अशी केली पूर्ण. 

Harshada Shirsekar | Published : Dec 30, 2023 3:22 PM IST / Updated: Dec 30 2023, 08:57 PM IST
16
पंतप्रधान मोदींनी मीरा मांझी यांच्या घराला दिली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (30 डिसेंबर 2023) अयोध्या शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळेस पंतप्रधानांनी रोड शो देखील केला. यानंतर पंतप्रधान मोदींनी पीएम आवास योजना आणि उज्ज्वला योजनेचे लाभार्थी मीरा मांझी यांच्या घराला भेट दिली.

26
पंतप्रधान मोदी मीरा मांझी यांच्या घरी पोहोचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गाडीतून उतरले आणि यानंतर पुढे चालत जाऊन मीरा मांझी यांच्या घरी दाखल झाले. यावेळेस परिसरातल्या लहान मुलांनी पंतप्रधानांसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षेच्या कारणास्तव SPG कमांडोंनी मुलांना रोखले.

36
पंतप्रधानांनी अशी केली मुलांची इच्छा पूर्ण

पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी घेणाऱ्या मुलीने म्हटले की, सुरक्षारक्षकांनी पंतप्रधानांसोबत सेल्फी घेण्यापासून रोखले होते. पण यावेळेस पंतप्रधानांनी कमांडोंना म्हटले की, 'लहान मुले आहेत, त्यांना सेल्फी घेऊ द्या'.

46
पंतप्रधानांनी मुलांना दिला ऑटोग्राफ

मीरा मांझी यांच्या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी परिसरातील लहान मुलांसोबत संवाद साधला. यादरम्यान एका मुलाने स्वतः रेखाटलेले चित्र पंतप्रधानांना दाखवले. चित्र पाहिल्यानंतर पंतप्रधानांनी त्यावर मुलाला ऑटोग्राफ देखील दिला.

56
लता मंगेशकर चौक

विमानतळावर दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर चौकातही थोडा वेळ थांबले होते.

66
मीरा मांझींच्या कुटुंबीयांसोबत 'चाय पे चर्चा'
Share this Photo Gallery