मीरा मांझीच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला चहाचा आस्वाद, मुलांचेही केले कौतुक पाहा PHOTOS
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 डिसेंबर, 2023) अयोध्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान, विमानतळाच्या दिशेने जाताना पंतप्रधान मीरा मांझी हीच्या घरी गेले. मीरा मांझी ही पीएम आवास योजना, उज्ज्वला योजनेची लाभार्थी आहे.
Chanda Mandavkar | Published : Dec 30, 2023 6:14 PM / Updated: Dec 30 2023, 06:20 PM IST
पंतप्रधानांचा अयोध्या दौरा
अयोध्या दौऱ्यावर आल्यानंतर मीरा मांझीला माहिती नव्हते पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी येणार होते. ते घरी येण्याच्या थोडावेळ आधी तिला याबद्दल कळले होते. अशातच मीरा मांझीने घाईघाईत घरातील तयारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
मीरा मांझीच्या घरी पंतप्रधानांचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मीरा मांझीच्या घरी आदरतिथ्याने स्वागत करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदींनी मांझीच्या मुलांचे कौतुकही केले.
मांझीच्या मुलांसोबत बातचीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांझीच्या मुलांसोबत बातचीत केली. मुलगी पंतप्रधानांशी बोलताना लाजत होती.
पंतप्रधानांसाठी मीराने बनवला चहा
पंतप्रधानांनी परिवारासोबतच्या बातचीतदरम्यान, मीराला चहा पाजण्याचा आग्रह केला.
मीराचा हातचा चहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीरा मांझीच्या हातच्या चहाचा आस्वाद घेतला.