
ठाण्यात गुन्हेगारीची परिस्थिती खूप वाईट असून ड्रग्ज माफियांमुळे गुन्हे वाढत असल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. खून आणि ड्रग्जच्या प्रकरणांमध्ये शिंदे गटातील व्यक्तींची नावे समोर येत असल्याचा आरोप करत संबंधितांनी आत्मपरीक्षण करावे, असे ते म्हणाले. मुख्य आरोपींना राजकीय दबावापोटी वाचवू नये आणि त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणीही जाधव यांनी केली.