Makrana Marble : राम मंदिर उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या दगडाची किंमत माहितीये?
Ram Mandir Inauguration Ceremony : अयोध्येतील श्री राम मंदिर उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या मार्बलचे वैशिष्ट्य माहीत आहे का?
Harshada Shirsekar | Published : Dec 21, 2023 9:28 AM IST / Updated: Jan 12 2024, 12:36 PM IST
श्री राम मंदिराचा उद्घाटन सोहळा कधी आहे?
अयोध्येतील श्री राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलला यांची प्राणप्रतिष्ठा या भव्यदिव्य सोहळ्याचे 22 जानेवारी 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास कित्येक व्हीव्हीआयपी पाहुणे हजर राहणार आहेत. पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्याचे कार्यही सुरू करण्यात आले आहे.
राम मंदिर उभारण्यासाठी कोणत्या दगडांचा वापर करण्यात येतोय?
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी मकराना नावाच्या दगडाचा वापर करण्यात आला आहे. याच दगडापासून ताजमहालाचीही निर्मिती करण्यात आली होती. हा दगड अतिशय मौल्यवान आहे आणि याचे अनेक वैशिष्ट्ये देखील आहेत.
मकराना दगड कुठे मिळतो?
मकराना दगड किंवा मकराना मार्बल जगभरात प्रसिद्ध आहे. अन्य मार्बलच्या तुलनेत मकराना मार्बलची गुणवत्ता आणि रंग अतिशय सुंदर आहे. राजस्थान राज्यातील डीडवाना जिल्ह्यातील मकरान नावाच्या शहरात हा दगड मिळतो.
मकराना मार्बलची किंमत?
मकराना दगडाची किंमत बाजारात वेगवेगळ्या दगडांनुसार ठरवली जाते. बाजारात या दगडाची प्रति स्क्वेअर फुट आकारानुसार किंमत सामान्यतः 80 रूपयांपासून ते दीड हजार रूपयांपर्यंत आहे.
मकराना मार्बलचे वैशिष्ट्य
मकराना मार्बल हे जगभरातील सर्वात चांगल्या गुणवत्तेचे मार्बल आहे. या मार्बलवरील चमक देखील सुंदर आहे. याहून अधिक चांगले मार्बल शोधून सापडणार नाही, असे म्हणतात.
मकराना मार्बलचीच का केली निवड?
मकराना मार्बलला कोणताही आकार देणे सोपे असते, असे म्हणतात. मंदिरातील गोल घुमट, फुलदाणी आणि अन्य आकृतींसाठीही या दगडाचा वापर केला जातो. या मार्बलचे आणखी तीन ते चार प्रकार आहेत, ज्याद्वारे मूर्तीही घडवल्या जातात.
मकराना मार्बलचा इतिहास
मकराना मार्बलचा इतिहास अतिशय जुना आहे. ताजमहाल उभारत असताना शाहजहान चुण्याचा शोध घेत होते. तेव्हा मकराना मार्बल मिळाला आणि त्यापासूनच ताजमहालाची निर्मिती करण्यात आली.