पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी 10 वंदे भारत एक्सप्रेसचे वर्च्युअली उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना आता फार मोठा दिलासा मिळाला आहे.
Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी (12 मार्च) गुजरात (Gujrat) येथून 10 वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले आहे. यामुळे मध्य प्रदेशला चौथी वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. याशिवाय वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडाही पंतप्रधानांनी दाखवल्याने आता प्रवाशांना प्रवास करणे सुखकर होणार आहे. खरंतर, वंदे भारत एक्सप्रेस ही एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. याचे भाडे अन्य ट्रेनपेक्षा थोडे अधिक आहे.
पंतप्रधानांनी केले वर्च्युअली उद्घाटन
मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत वर्च्युअली उद्घाटन केले आहे. यामुळे मध्य प्रदेशाला चौथी वंदे भारत एक्सप्रेस मिळाली असून ती खजुराहो येथून हजरत निजामुद्दीन दिल्लीपर्यंत धावणार आहे. एक्सप्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी पंतप्रधानांसह खासदार वीडी शर्मा देखील उपस्थितीत होते.
खजुराहो ते हजरत निजामुद्दीनपर्यंत धावणार ट्रेन
वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवास करणे आरामदायी आहे. ट्रेनसाठी पाच थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये खजुराहो, ग्वालियार, झांसी, ललितपुर आणि टीकमगढ स्थानकांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वे झोन, भोपाळ विभागानुसार खजुराहो येथून हजरत निजामुद्दीनदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला जवळजवळ 667 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 6 तास 40 मिनिटांचा कालावधी लागतो.
वंदे भारत एक्सप्रेस खजुराहो येथून दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुटणार असून रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी दिल्लीला पोहोचणार आहे. फक्त सोमवारी वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार नाही. अन्यथा आठवड्यातील सहा दिवस ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असणार आहे.
आणखी वाचा :
देशभरात CAA लागू, लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा - DRDO चे मिशन दिव्यास्त्र यशस्वी, या मिशनमध्ये काय खास आहे?