पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, VIDEO मध्ये तलवारीचा धाक दाखवत असलेल्या व्यक्तीच्या विरोधात FIR दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Chanda Mandavkar | Published : Mar 5, 2024 6:20 AM IST / Updated: Mar 05 2024, 11:57 AM IST

PM Narendra Modi Threat to Kill : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात कर्नाटकातील एका व्यक्तीच्या विरोधात पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद रसूल कडारे असे व्यक्तीचे नाव असून त्याने सोशल मीडियावरील अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रसूल तलवारीचा धाक दाखवत म्हणतोय की, “काँग्रेसचे सरकार केंद्रात आल्यास पंतप्रधान मोदी यांची हत्या करेन.”

रिपोर्ट्सनुसार कर्नाटकातील (Karnataka) यदगिरी पोलिसांच्या हवाल्याने सांगण्यात आलेय या प्रकरणात सुरपुर पोलीस स्थानकात मोहम्मद रसूल कडारे (Mohammed Rasool Kaddare) याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या मते, आरोपीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात आरोपीच्या विरोधात आयपीसीच्या (IPC) कलम 505 (1) (B) आणि आर्म्स अ‍ॅक्टअंतर्गत एफआयआर (FIR) दाखल केलाय. सुरपुर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेताल जात असून या प्रकरणात हैदराबादसह काही ठिकाणी छापेमारी केली जात आहे.

ज्येष्ठ वकील नलिन कोहली यांनी दिली प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याने भाजप नेते आणि जेष्ठ वकील नलिन कोहली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोहली यांनी म्हटले की, "पंतप्रधानांना देण्यात आलेल्या धमकीवरुन दिसते कर्नाटकातील अशा काही गोष्टी उघडकीस येतात ज्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा केल्या जात आहेत. याशिवाय जे पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देतात आणि जे तेथील रेस्टॉरंटमध्ये बॉम्ब फेकून पळून जातात.

कर्नाटकातील पोलीस आणि अन्य यंत्रणा आपले काम जरुर करताय. पण प्रश्न असा उपस्थितीत होतोय, एकत्रित अशा काही गोष्टी घडतायत यामागे अखेर मानसिकता काय आहे? "

उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. याशिवाय ज्या क्रमांकावर धमकीचा फोन आला होता तो ट्रेस करण्याचा देखील प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

Mahua Moitra : तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ मोइत्रा यांना उच्च न्यायालयाचा धक्का, लाचखोरीचा आरोप करण्यापासून रोखण्याची फेटाळली मागणी

Arvind Kejriwal : 12 मार्चनंतर केजरीवाल ईडीसमोर होणार हजर, 8व्या समन्सला दिले उत्तर

Postal Ballots च्या आधारे मतदान करण्याच्या नियमात बदल, 85 वर्षांपेक्षा कमी वयातील नागरिकांना घरबसल्या मत देता येणार नाही

Share this article