Budget 2024 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष, कृषी क्षेत्रासाठी या घोषणेची शक्यता

मोदी सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी काय घोषणा केली जाऊ शकते याबद्दल जाणून घेऊया अधिक...

Chanda Mandavkar | Published : Jan 19, 2024 8:04 AM IST / Updated: Jan 31 2024, 09:57 AM IST

Budget 2024 : मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतिम अर्थसंकल्प फेब्रुवारी 2024 रोजी सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारनुसार, शेतकऱ्यांसाठी यंदाचा अर्थसंकल्प खास असणार आहे.

किसान सन्मान निधीत वाढ होऊ शकते
मोदी सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. दीर्घकाळापासून किसान सन्मान निधी (Kisan Samman Nidhi) योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी केली जात होती. अशातच अर्थसंकल्प 2024 मध्ये मोदी सरकारकडून किसान सन्मान योजनेच्या रक्कमेत वाढ केली जाऊ शकते.

किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रूपयांची आर्थिक मदत केली जाते. पण यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेअंतर्गत रक्कमेत दोन हजार रूपयांची वाढ होऊ शकते. जेणेकरुन शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत एकूण आठ हजार रूपयांची मदत मिळू शकते.

चार महिन्यातून एकदा दिला जातो हप्ता
शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत टप्याटप्याने पैसे दिले जातात. प्रत्येक चार महिन्यातून एकदा शेतकऱ्याच्या बँक खात्यात दोन हजार रूपये जमा केले जातात. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेअंतर्गत आठ हजार रूपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याची घोषणा केल्यास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन टप्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार
1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभा निवडणूका (Lok Sabha Elections) पाहता, मोदी सरकार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा करू शकते. यामुळे अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी काय घोषणा केल्या जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा : 

Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प या दिवशी होणार सादर

आधारकार्डच्या या नियमांत झालेत बदल, जाणून घ्या अधिक

Odisha : जगन्नाथ पुरी हेरिटेज कॉरिडॉरचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केले उद्घाटन, 800 कोटी रूपयांचा खर्च करून बांधण्यात आलाय प्रकल्प

Read more Articles on
Share this article