'संदेशखळीतील दोषींना तुरुंगात आयुष्य घालवावे लागेल...' पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा TMC वर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशखळीतील दोषींना तुरुंगात आयुष्य घालवावे लागेल असे विधान पश्चिम बंगालमधील जनसभेत केले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे.

PM Narendra Modi Visit in West Bengal : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (4 एप्रिल) पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी कूचबिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका सार्वजनिक रॅलीला संबोधित करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानले. 

पुढे पंतप्रधानांनी म्हटले की, “वर्ष 2019 मध्ये एका रॅलीला संबोधित करण्यासाठी मी या मैदानावर आलो होते. त्यावेळी त्यांनी मैदानाचा आकार लहान दिसावा म्हणून यामध्ये एक लहान स्टेज उभारला होता. त्यावेळी मी म्हणालो होतो की, जनता याचे उत्तर नक्कीच देईल.” यावेळी ममता दीदींनी कोणताही अडथळा आणलेला नाही. यामुळेच मला तुम्हाला भेटण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. 

संदेशखळीतील दोषींचे आयुष्य तुरुंगात जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनसभेला संबोधित करताना असेही म्हटले की, "10 वर्षांमध्ये जो विकास झालाय तो केवळ ट्रेलर आहे. माझे विरोधक नेहमीच म्हणतात मोदींचा परिवार नाही. मोदींसाठी भारतच संपूर्ण परिवार आहे. संपूर्ण बंगाल आणि देशाचे पाहिलेय कशा प्रकारे संदेशखळीतील दोषींचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. संदेशखळीतील महिलांसोबत जे झाले ते तृणमूल काँग्रेसच्या अत्याचारांची पराकाष्ठा होती. भापने ठरवलेय की, संदेशखळीतील दोषींना शिक्षा देऊनच राहणार. त्यांना आपले आयुष्य तुरुंगातच घालवावे लागेल."

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, मी भ्रष्टाचार हटाओचा नारा देतोय. पण विरोधक भ्रष्टाचाऱ्यांचा बचाव करणाची भूमिका घेत आहेत. भाजप सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणला आहे. याबद्दल इंडिया आघाडी (INDIA Alliance) चुकीची माहिती पसरवत आहेत. इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेस, लेफ्ट आणि काँग्रेसकडून खोटे राजकरण केले जात आहे. बंगालचे रूप संपूर्ण देश पाहत आहे.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसला आणखी एक धक्का, पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश

Lok Sabha Election 2024: राहुल गांधींची संपत्ती किती? कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये किती पैसे तर, स्टॉक मार्केटची गुंतवणूक किती जाणून घ्या...

रणदीप सुरजेवाला यांचे हेमा मालिनींबद्दल वादग्रस्त विधान, भाजपसह कंगना राणौतने केला काँग्रेस नेत्यावर हल्लाबोल

Read more Articles on
Share this article