
एंटरटेनमेंट डेस्क : आजच्या भागात लीलाची लहान बहीण रेवती ही विक्रांत नावाच्या एका मुलाच्या प्रेमात पडली आहे. सुरुवातीला लीलाने दोघांचं नातं मान्य केलं होतं. मात्र, आता लीलाने विक्रांतला एका दुसऱ्याच महिलेबरोबर पाहिलं. अधिक चौकशी केली असता, ती महिला विक्रांतची बायको असल्याचं लीलाच्या समोर आलं आहे. तसेच रेवतीला मी फसवत आहे अशी देखील कबुली विक्रांत लीला देतो.
कसं आपण तुझ्या बहिणीला फसवलं, आपला हात न कापता देखील आपण तिला कसं जीव द्यायला भाग पाडलं आणि हा सगळा आपलाच डाव होता, हे विक्रांत लीला समोर कबूल करतो. मात्र, आता तुझ्या बहिणीला आणखी भोग भोगावे लागतील असं तो म्हणतो. लीला पोलीस स्टेशन हुन परत आल्यावर तिला सारखा विक्रांतचा खोटारडेपणाचा चेहरा डोळा समोर येतो.त्याच वेळी तिचा आणि आई मावशीचा वाद होतो आणि अचानक ती बाबांच्या गळ्यात पडून रडायला लागते. तिला कारण विचारले असता तिला ते कारण सांगता देखील येत नाही.
असचं संध्याकाळ होते आणि संध्याकाळी अचानक विक्रांत लीला आणि रेवतीच्या घरी येतो. रेवतीने प्रश्न विचारताच तो सांगतो ,मी या एरियाचा पोलीस अधिकारी असल्याने चौकशी करायला आलो आहे. माझा एरिया माझा जबाबदारी असं तो म्हणतो. तेव्हा रेवतीचे बाबा त्याला विचारतात तुमच्या हातावरची जखम असली तर म्हणतो गुन्हेगारांमागे जावं लागत त्यातून हि जखम झाली असल्याचे सांगतो. हे संपूर्ण संभाषण सुरु असताना लीला त्याचा खूप तिरस्कार करते. ती विचार करत असते कसा विक्रांतचा खोटारडेपणा रेवती समोर आणावा.
रेवती समोर येणार विक्रांतचा खरा चेहरा ?
लीला रेवतीला घडलेला संपूर्ण प्रकार सांगते. पण रेवतीचा विश्वास बसत नाही. म्हणून रेवतीला घेऊन लीला पोलीस स्टेशन गाठते. तिथे येऊन रेवती म्हणते हा माझ्या वर प्रेम करतो, मला फसवण्याचा विचार देखील करणार नाही. पण लीला त्याच्या हातावर बांधलेली पट्टी दाखवते. तेव्हा रेवतीचा विश्वास बसत नाही. नंतर लीला विक्रांतच्या हातावरची पट्टी काढून विक्रांतचा खोटारडेपणा रेवती समोर आणते.