राम मंदिराच्या उद्घाटनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान करणार आहेत. यादरम्यान पंतप्रधानांनी ऑडिओ मेसेजमध्ये जनतेला खास संदेश दिला आहे.
PM Modi 11 Day Anushthan : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक मेसेज लिहिला आहे.
यामध्ये पंतप्रधानांनी म्हटले की, “रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 11 दिवस शिल्लक राहिले आहेत. माझे सौभाग्य आहे की, या शुभ सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. पुढे म्हटले की, परमेश्वरामे मला जीवनाच्या अभिषेक दरम्यान भारतातील नागरिकांचे प्रतिनिधत्व करण्याचे एक साधन बनवले आहे. हे लक्षात घेता, आजपासून 11 दिवस विशेष अनुष्ठानाची सुरूवात करत आहे. मी तुमच्या सर्वांकडून आशीर्वाद मागत आहे. मला माझ्या भावना शब्दात मांडणे कठीण होतेय. पण मी माझ्याकडून एक प्रयत्न केला आहे.”
पंतप्रधानांनी ऑडिओमधून दिला जनतेला संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधी भावूक झाल्याचे म्हटले आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मला अशा प्रकारच्या भावना येत आहेत. पंतप्रधानांनी एक विशेष ऑडिओ संदेशच्या माध्यमातून काही गोष्टी बोलल्या आहेत. याशिवाय पंतप्रधानांनी आपल्या मेसेजमध्ये असेही म्हटले की, त्यांचे सौभाग्य आहे त्यांना या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.
ऑडिओ संदेशमध्ये काय म्हणाले पंतप्रधान?
ऑडिओची सुरुवात पंतप्रधानांनी 'सियावर राम चंद्र की जय' म्हणत केली. पुढे पंतप्रधानांनी म्हटले की, "माझ्या देशबांधवांनो राम-राम. आयुष्यातील काही क्षण दैवी आशीर्वादानेच वास्तवात बदलतात. आज भारतीय आणि जगभरातील रामभक्तांसाठी एक पवित्र क्षण आला आहे. प्रत्येक ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या भक्तीचे अद्भूत वातावरण आहे. चहूबाजूंना प्रभू रामांच्या नावाचा सूर येतोय. प्रत्येकाकडून येत्या 22 जानेवारीची प्रतीक्षा केली जात आहे….त्या ऐतिहासिक प्रवित्र क्षणाचा. आता अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 11 दिवसच शिल्लक राहिले आहेत. माझे सौभाग्य आहे की, मला या शुभ सोहळ्याचा साक्षीदार बनण्याची संधी मिळाली आहे."
आणखी वाचा :
Budget 2024 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प या दिवशी होणार सादर
शेफ मनोहर राम मंदिरासाठी तयार करणार सात हजार किलोंचा 'Ram Halwa'