दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही आणि लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही, हे ऑनलाइन कसं तपासायचं ते आपण जाणून घेऊया.
दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठी आर्थिक भेट दिली आहे. ३० ऑक्टोबर २०২৬ रोजी गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील भिलडी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता जारी केला. यामुळे देशभरातील ९.३४ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट २००० रुपये पोहोचले आहेत. सरकारने या हप्त्यापोटी एकूण १८,६८० कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. दिवाळीपूर्वी पैसे मिळाल्याने शेतकरी कुटुंबे साहजिकच खूश आहेत. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण ६००० रुपये मिळतात. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा होतात. आधार व्हेरिफिकेशन आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे ही मदत दिली जाते.
25
तुमचं नाव कायमचं कट झालंय का?
यावेळच्या हप्त्यात एक मोठा बदल दिसून आला आहे. २३ व्या हप्त्यात ९.४४ कोटी शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते, तर २४ व्या हप्त्यात ९.३४ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. म्हणजेच, गेल्या वेळच्या तुलनेत सुमारे १० लाख लाभार्थी कमी झाले आहेत. पण याचा अर्थ असा नाही की १० लाख शेतकऱ्यांची नावे कायमची वगळण्यात आली आहेत. सरकारी वेबसाईटनुसार, काही संशयास्पद खात्यांचे व्हेरिफिकेशन सुरू आहे, त्यामुळे त्यांचे पैसे तात्पुरते रोखले आहेत. विशेषतः १ फेब्रुवारी २०१९ नंतर ज्यांनी जमीन खरेदी केली आहे किंवा एकाच कुटुंबातील अनेक सदस्य लाभ घेत आहेत, त्यांची माहिती तपासली जात आहे. व्हेरिफिकेशन पूर्ण होईपर्यंत हे पैसे अडकू शकतात. त्यामुळे पैसे आले नाहीत तर आपलं नाव कायमचं कट झालंय, असा विचार करू नका.
35
मोबाईल नंबरवर एक ओटीपी
सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर पीएम किसानची अधिकृत वेबसाईट उघडा. होमपेजवरील 'Know Your Status' या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. नंबर माहीत नसेल तर तुम्ही वेबसाईटचा सर्च पर्याय वापरू शकता. स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल, तो टाकल्यावर तुम्हाला खात्याचं स्टेटस दिसेल. तिथे हप्त्याची सविस्तर माहिती, पैसे पाठवले आहेत की नाही किंवा काही व्हेरिफिकेशन बाकी आहे का, हे समजेल. याशिवाय तुम्ही बँकेचं ॲप, एसएमएस किंवा बँक स्टेटमेंट तपासूनही पैसे जमा झालेत की नाही ते पाहू शकता.
यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासणं खूप सोपं आहे. आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. तिथे 'Farmers Corner' अंतर्गत 'Beneficiary List' हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचं राज्य, जिल्हा, तालुका किंवा ब्लॉक आणि गावाचं नाव सिलेक्ट करा. 'Get Report' वर क्लिक करताच त्या भागातील लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर येईल. तिथे तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही सहज पाहू शकता. जर नाव नसेल किंवा हप्त्याचे पैसे आले नसतील, तर 'Know Your Status' पर्यायावर जाऊन सविस्तर माहिती तपासा. विशेषतः ई-केवायसी (e-KYC) केलं आहे की नाही, आधार आणि बँकेची माहिती बरोबर आहे की नाही आणि जमिनीच्या रेकॉर्डचं व्हेरिफिकेशन झालं आहे की नाही, हे तपासून पाहणं गरजेचं आहे.
55
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर
पीएम किसान योजनेत नाव नोंदवलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) करणं बंधनकारक आहे. तुम्ही अधिकृत वेबसाईट, पीएम किसान मोबाईल ॲप किंवा मान्यताप्राप्त कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) द्वारे हे करू शकता. सीएससीमध्ये बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनची सुविधाही उपलब्ध आहे. तुमचं आधार कार्ड बँकेशी योग्य प्रकारे लिंक आहे की नाही, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) सुरू आहे की नाही आणि जमिनीच्या रेकॉर्डमध्ये काही चूक तर नाही ना, हे तपासून घ्या. काही माहिती चुकीची असल्यास संबंधित बँक किंवा स्थानिक कृषी कार्यालयात जाऊन ती दुरुस्त करा. पैसे आले नाहीत म्हणून अनोळखी व्यक्तीला आधार नंबर, बँकेची माहिती किंवा ओटीपी देऊ नका. अधिकृत वेबसाईटवरच स्वतःचं स्टेटस तपासणं सर्वात सुरक्षित आहे. २४ व्या हप्त्याचे पैसे रिलीज झाले असल्याने, पात्र शेतकऱ्यांनी आपलं नाव, ई-केवायसी आणि बँकेची माहिती लवकरात लवकर तपासून घ्यावी.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.