नोव्हेंबर महिना सुरू होताच सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे ५ मोठे बदल होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून GST, LPG सिलिंडरचे दर आणि मोबाईल कॉलिंगच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल लागू होतील. हे नवीन नियम कोणते आहेत, ते नक्की जाणून घ्या.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच देशभरात अनेक नियमांमध्ये मोठे बदल होत आहेत. १ नोव्हेंबरपासून GST, LPG सिलिंडर, मोबाईल आणि हायवेच्या नियमांत बदल होतील. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होणार आहे.
28
GST रिफंडसाठी ऑटोमॅटिक अप्रूव्हल
सरकार GST प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी नवीन पावले उचलत आहे. टॅक्स रिफंडला होणारा उशीर टाळण्यासाठी काही प्रकरणांमध्ये ऑटोमॅटिक अप्रूव्हल सिस्टीम सुरू केली जाईल. यामुळे व्यापाऱ्यांचा कागदपत्रांचा ताणही कमी होणार आहे.
38
छोट्या व्यापाऱ्यांसाठी नवीन रिटर्न सिस्टीम
जे व्यापारी थेट ग्राहकांना वस्तू किंवा सेवा पुरवतात आणि ज्यांची वार्षिक उलाढाल ५ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी नवीन रिटर्न सिस्टीम लागू होणार आहे. या निर्णयामुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
दर महिन्याप्रमाणे १ नोव्हेंबरलाही सर्वसामान्यांचे लक्ष LPG सिलिंडरच्या दरांकडे असेल. यापूर्वी १ ऑक्टोबरला तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६२.५० रुपयांची वाढ केली होती. मात्र, १४ किलोच्या घरगुती सिलिंडरचे दर स्थिर होते. आता १ नोव्हेंबरला यात बदल होण्याची शक्यता आहे.
58
ATF च्या दरातही होऊ शकतो बदल
केवळ LPG सिलिंडरच नाही, तर नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) म्हणजेच विमान इंधनाच्या दरातही बदल होण्याची दाट शक्यता आहे.
68
मोबाईलवर कॉलरचे नाव दिसणे बंधनकारक
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १ नोव्हेंबरपासून मोबाईल युजर्सना कॉलरचे नाव दिसणे बंधनकारक होणार आहे. दूरसंचार विभागाने (DoT) टेलिकॉम कंपन्यांना कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNAP) सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ट्रुकॉलरसारख्या ॲपवर अवलंबून राहावे लागणार नाही.
तामिळनाडूत १ नोव्हेंबरपासून मद्य खरेदीच्या नियमांत बदल होत आहे. तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशनने (TASMAC) १००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मद्यासाठी डिजिटल पेमेंट बंधनकारक केले आहे. आता या दुकानांमध्ये रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही.
88
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मालवाहू वाहनांना बंदी
महाराष्ट्र हायवे पोलिसांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या नवीन कनेक्टिंग लिंकवर मालवाहू वाहनांना कायमस्वरूपी बंदी घातली आहे. १ नोव्हेंबरपासून हा नियम लागू होईल. यात छोटी व्यावसायिक वाहने, पिकअप व्हॅन आणि टाटा एस सारख्या गाड्यांचा समावेश आहे. मात्र, खाजगी गाड्या आणि प्रवासी बसेसना परवानगी असेल.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.