'बाई काय प्रकार', मॉलच्या VIP बाथरुबाहेर तैनात महिलेची ग्राहकांकडे विचित्र मागणी

बंगळुरुमधील फिनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये VIP बाथरुमची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या बाथरुमचा वापर करण्यासाठीची अट अशी की, ग्राहकाने कमीतकमी हजार रुपयांची खरेदी केलेल्याचे बिल असावे.

Chanda Mandavkar | Published : Sep 17, 2024 2:27 PM IST

Viral : बंगळुरुमधील प्रसिद्ध फिनिक्स मार्केटसिटी मॉल सध्या तेथील बाथरुममुळे चर्चेत आहे. या मॉलमध्ये व्हिआयपी बाथरुमची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एवढेच नव्हे बाथरुम बाहेर एका महिलेलाही तैनात केले आहे. या महिलेकडून बाथरुमला जाणाऱ्या ग्राहकांकडून आधी शॉपिंगचे बिल मागितले जाते. यानंतरच बाथरुममध्ये जाण्याची परवानगी दिली जाते. यावेळी ग्राहकाकडे कमीतकमी 1 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कमेचे बिल असावे अशीही अट घालण्यात आली आहे.

बंगळुरुतील व्हाइटफिल्ड येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलवर व्हीआयपी टॉयलेटमुळे सोशल मीडियावर जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. Reddit वर DeskKey9633 नावाच्या युजरने म्हटले की, त्याला कशाप्रकारे हजार रुपयांचे बिल नसल्याने तळमजल्यावरील टॉयलेटसाठी जाण्यास रोखले गेले.

टॉयलेटचा वापर करण्याआधी दाखवा बिल
युजरने म्हटले की, फिनिक्स व्हाइटफिल्ड येथे खरेदी करण्यासाठी गेलो. हे ठिकाण माझ्या घरापासून खूप दूर आहे. मला खरेदी करण्याआधी टॉयलेटला जायचे होते. येथील तळमजल्यावरील शौचालयास आता व्हीआयपीचे रुप देण्यात आले आहे. याशिवाय वॉशरुम बाहेर महिलेला तैनात करत तिला ग्राहकांचे बिल तपासल्यानंतर त्यांना आतमध्ये पाठवण्याची परवानगी देण्याचे काम सोपवले आहे. बिलाची रक्कम कमीतकमी हजार रुपये असावी अशी अटही घालती होती. युजरने प्रश्न उपस्थितीत करत म्हटले की, शौचालयाचा वापर करण्यासाठी बिलाची काय गरज?

मॉलमधील अन्य शौचालयाची स्थिती
युजरने पुढे म्हटले की, मॉलमधील दुसऱ्या मजल्यावरील शौचालयात गेलो असता ते अतिशय घाणेरडे आणि अस्वच्छ होते. फ्लश देखील बाथरुममधील काम करत नव्हता. युजरने म्हटले की, मी बंगळुरु अथवा अन्य शहरातील दुसऱ्या मॉलची अशी स्थिती कधीच पाहिली नाही. खरंतर, व्हीआयपी टॉयलेटचा ट्रेण्ड असल्यास ही फार वाईट बाब आहे. रेडिटरने पोस्ट शेअर केल्यानंतर युजर्सने कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे.

पैशांची मागणी करते महिला
एका युजरने कमेंट केली की, ही खरी बाब आहे. एक महिला सुरक्षा गार्ड असून ग्राहकांना बाथरुममध्ये जाण्याआधी ग्राहकांची अडवणूक करते. एवढेच नव्हे पैशांची देखील मागणी केली जाते. याशिवाय एका प्रकारचा पास तयार केला जातो. दुसऱ्याने म्हटले की, शौचास जाण्यासाठी 20 रुपये अनिवार्य रुपात स्वैच्छिक रुपात दान केले जात होते.

आणखी वाचा : 

PM Modi Birthday Special : पंतप्रधानांच्या दशपूर्तीमधील 10 मोठे निर्णय

Kolkata Case : पोलिसांच्या या 10 चुकांमुळे ममता बॅनर्जी आल्या निशाण्यावर

Share this article