Paytm पेमेंट बँकेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या, नक्की काय आहे कारण वाचा सविस्तर...

Published : Feb 27, 2024, 05:42 PM ISTUpdated : Feb 27, 2024, 06:21 PM IST
Paytm Latest news

सार

पेटीएमच्या अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहेत. याआधी आरबीआयने पेटीएम पेमेंट्सवर हल्लाबोल केल्यानंतर बोर्डाच्या मेंबर्सने कंपनीला रामराम केला. अशातच इंदूरमधील कंपनीच्या फिल्ड मॅनेजरने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Paytm Payment Bank : मध्य प्रदेशातील इंदुर (Indore) येथील पेटीएम कंपनीचे फिल्ड मॅनेजर गौरव गुप्ता यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 25 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता घडल्याचे सांगितले जात आहे. पत्नीने गौरव यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. असे सांगितले जातेय की, पेटीएम बंद होण्याच्या चर्चेमुळे गौरव तणावाखाली होती. दरम्यान, पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाइट नोट सापडलेली नाही.

पोलीस अधिकारी तारेश कुमार सोनी यांनी म्हटले की, गौरव गुप्ता हे कंपनी बंद होणार असल्याच्या भीतीपोटी तणावाखाली आले होते. अशातच आपली नोकरी जाऊ शकते असेही गौरव यांना वाटत होते. पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास केला जात आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेची मूदत 31 मार्च पर्यंत वाढवली
पेटीएम पेमेंट बँक आरबीआयच्या (RBI) नियामक प्रकरणांमध्ये अडकली गेली आहे. पेटीएमकडून मोठ्या प्रमाणात केवायसीचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळेच आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बहुतांश कामकाजावर बंदी घालण्याचा निर्मय घेतला आहे.

आरबीआयने गाइडलाइन्स जारी करत म्हटेल की, 15 मार्चनंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच पैसे जमा किंवा क्रेडिट करता येणार नाही. यासाठीची आधी मूदत 29 फेब्रुवारी देण्यात आली होती. पण ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून आरबीआयने येत्या 15 मार्च पर्यंत व्यापारी आणि नागरिकांना आपली खाती ऑप्शनल बँकांमध्ये ट्रान्सफर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पेटीएम पेमेंट बँकेच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला केले गुडबाय
पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी 26 फेब्रुवारीला पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बोर्डावरुन राजीनामा दिला आहे. याआधी बोर्डाच्या दोन सदस्यांनी कंपनीला गुडबाय केले आहे. डिसेंबर महिन्यात शिंजनी कुमार यांनी राजीनामा दिला होता. याशिवाय एसबीआयच्या माजी व्यवस्थापकीय संचालक मंजू अग्रवाल यांनी बोर्डाचा राजीनामा दिला होता.

आणखी वाचा : 

Railway Jobs : RRB RPF SI, हवालदार भरतीची अधिसूचना निघाली बनावट, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिली माहिती

तुम्ही डोळे बंद करून बसलायत...बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

Amazon Pay : स्पर्धा झाली तीव्र, RBI ने Amazon Pay ला पेमेंट एग्रीगेटर म्हणून दिली मान्यता

PREV

Recommended Stories

Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!
EMI मध्ये मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट घटवला, कर्ज घेणे होणार स्वस्त, जाणून घ्या फायदा