योग गुरु रामदेव बाबा यांच्या मालकी हक्क असणाऱ्या पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल आणि खोट्या जाहिरातींबद्दल सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली. या सुनावणीवेळी कोर्टाने सरकारला चांगलेच फटकारले आहे.
SC slams Centre for defending Baba Ramdev : सुप्रीम कोर्टाने मंगळवारी (27 फेब्रुवारी) रामदेव बाबा यांचे मालकी हक्क असणाऱ्या पतंजली आयुर्वेदाच्या (Patanjali Ayurveda) दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरुन केंद्र सरकारला फटकारले आहे. योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान, तुम्ही डोळे बंद करून बसला आहात असे म्हणत सरकारला चांगलेच सुनावले आहे.
सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान काय म्हटले?
सुप्रीम कोर्टाने म्हटले की, पतंजली आयुर्वेदाच्या जाहिराती संपूर्ण देशाची दिशाभूल करत आहेत. हे फार दुर्दैवी आहे. सरकार डोळे बंद करून बसलेय. सरकारने तत्काळ या संदर्भात कार्यवाही करावी. खंडपीठाने आदेश दिलाय की, दिशाभूल करणाऱ्या सर्व औषधांसंदर्भातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट जाहिरातींवर तत्काळ बंदी घालावी.
तत्कालीन सरन्यायाधीश एनवी रमन्ना यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी
सुप्रीम कोर्टाचे तत्काल सरन्यायाआधीश एनवी रमन्ना (CJI N. V. Ramana) यांच्या खंडपीठाने बाबा रामदेव यांच्या पंतजलीच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना इशारा दिला आहे. कोर्टाने गेल्या वर्षात नोव्हेंबर 2023 मध्ये पतंजली आयुर्वेदला आपल्या औषधांबद्दलच्या जाहिरातीसंदर्भात खोट्या आणि दिशाभूल दावे करण्यासंदर्भात सावधगिरीचा इशारा दिला होता.
दरम्यान, सुप्रीम कोर्टात इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (Indian Medical Association) बाबा रामदेव यांच्या जाहिरातींवरुन याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत म्हटले होते की, बाबा रामदेव यांचे मालकी हक्क असणाऱ्या पतंजली आयुर्वेदाच्या माध्यमातून कथित रुपात ॲलोपॅथी आणि डॉक्टरांसंदर्भात भ्रम पसरविला जात आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वकिलांनी म्हटले होते की, या जाहिरांमध्ये असे म्हटलेय आधुनिक औषध घेऊनही चिकित्सकांचा मृत्यू होत आहे.
आणखी वाचा :
Sidhu Moosewala : सिद्धू मूसेवालाची आई वडील लवकरच दुसऱ्या मुलाचे होणार पालक