जम्मू काश्मीरमध्ये दहशहतवादी हल्ले वाढत चालले असून जापूर येथील पर्यटक पती आणि पत्नीवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. अनंतनाग येथे भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या काळात दहशतवादी हल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शनिवारी जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी हल्ला करून दहशतवाद्यांनी अशांततेचा संदेश दिला आहे. अनंतनाग येथे जापूरमधील पती पत्नी पर्यटक यांना गोळी झाडून हत्या करण्यात आली तर दुसऱ्या बाजूला शोपियानमध्ये भाजप नेत्याची हत्या केल्याने दहशत निर्माण झाली आहे.
घडलेल्या हल्याचा केला निषेध -
या घडलेल्या हल्याचा माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी निषेध व्यक्त केला आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी मत व्यक्त करताना म्हटले आहे की, पहलगाममध्ये दोन पर्यटकांवर झालेले हल्ले आणि शोपियानमधील माजी सरपंचाची हत्या ही चिंतेची बाब आहे. दक्षिण काश्मीरमधील निवडणुका विनाकारण लांबवल्या गेल्या आहेत. ही चिंतेची बाब असून भारत सरकार सातत्याने दावा करत आहे की येथील परिस्थिती सामान्य आहे मात्र दुसऱ्या बाजूला दहशतवादी कारवाया सातत्याने वाढत आहेत.
संपूर्ण प्रकरण घ्या जाणून -
निवडणुकीपूर्वी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद्यांनी दहशत पसरवली होती. शनिवारी शोपीयानच्या हीरपोरा भागात दहशतवाद्यांनी भाजप नेते आणि माजी सरपंच एजाज अहमद यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले माजी सरपंच एजाज अहमद यांना रुग्णालयात आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पहलगाम येथील पर्यटक शिबिरावर हल्ला -
दुसरी घटना अनंतनाग येथे घडली आहे. येथील पहलगाम येथील पर्यटक कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात राजस्थानमधील जयपूर येथील एका जोडप्याला गोळ्या लागल्या. पती तबरेज आणि पत्नी फरहा यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे डॉक्टर दोघांवर उपचार करत आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
आणखी वाचा -
'ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील...', उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
रविवारी मुंबईकरांचा खोळंबा, ‘या’ मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक