होळीच्या दिवशी देशभरात वेग वेगळ्या घटना घडल्याचे बातम्यांमधून पहिले असेल. दिल्ली येथे अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथे पुरुषाने त्याच्या पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना झाली.
होळीच्या दिवशी देशभरात वेग वेगळ्या घटना घडल्याचे बातम्यांमधून पहिले असेल. दिल्ली येथे अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथे पुरुषाने त्याच्या पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना झाली. या घटनेनंतर सगळीकडे हाहाकार उडाला आहे. या कुटुंबातील पुरुषाचे महिलेशी सहा वर्षांपूर्वी लग्न झालेले असून त्याला दोन मुले होती.
त्या मुलांचे वय पाच आणि तीन वर्ष असल्याची माहिती समजली आहे. या झालेल्या घटनेननंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला तात्काळ सुरुवात केली आहे. या घटनेमुळे कुटुंब या संस्कृतीची पूर्ण पद्धतच बिघडून गेली आहे. हल्लेखोराची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
होळीचा सण एका बाजूला साजरा होत असताना अशा प्रकारे घडलेल्या घटनेमुळे सगळीकडे वातावरण बिघडून गेले आहे. पोलिसांना सकाळी या दुर्घटनेची फोनवरून माहिती समजली. त्यानंतर ते घटनास्थळी पोहचल्यानंतर मृत महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. अलीपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईला सुरुवात केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आणखी वाचा -
Mumbai Weather : मुंबईत तापमानाचा पारा वाढणार, उन्हाच्या झळांपासून अशी घ्या आरोग्याची काळजी
मलाड येथे 15 फूट खोल गटारात पडून परिवारातील दोन जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक