सद्गुरुंच्या तब्येतीत चांगली सुधारणा, सोशल मीडियावर पोस्ट टाकून दिली माहिती

Published : Mar 25, 2024, 07:18 PM IST
Sadguru-health-update

सार

सद्गुरू गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे आपण वाचले असेल. त्यांच्या डोक्यात ब्लीडींग होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते आणि नंतर डॉक्तरांच्या चमूने त्यांच्यावर ऑपरेशन पूर्ण केले.

सद्गुरू गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे आपण वाचले असेल. त्यांच्या डोक्यात ब्लीडींग होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते आणि नंतर डॉक्तरांच्या चमूने त्यांच्यावर ऑपरेशन पूर्ण केले. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबद्दलची माहिती देण्यात आली होती. ते तब्येत कशी आहे याची अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत होते.

डॉक्टरांच्या पथकाने केले यशस्वी ऑपरेशन 
दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सद्गुरूंच्या मेंदूवर एक जटिल आणि यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अपोलोच्या टीमचे डॉ. विनीत सुरी, डॉ. प्रणवकुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस. चॅटर्जी यांनी सद्गुरु जग्गी यांच्या मेंदूवर तातडीची शस्त्रक्रिया केली. ऑपरेशननंतर सद्गुरूंनाही व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे. ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सद्गुरू एक इन्स्पिरेशनला स्पीकर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. देश विदेशात त्यांचे भक्तगण असून त्यांनी सद्गुरू यांना लवकर बरे वाटावे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रार्थना केल्या आहेत. अनेक जणांनी सद्गुरू लवकर बरे व्हावेत असे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच सद्गुरू यांनी महाशिवरात्री निमित्त कोईम्बतूर येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. 
आणखी वाचा - 
शिल्पकार अरुण योगीराज यांनी अयोध्येत बनवला राम लल्लाचा छोटा पुतळा, फोटो व्हायरल, पाहा
IPL 2024: रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या चाहत्यांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात एकमेकांना केली मारहाण; Video झाला व्हायरल

PREV

Recommended Stories

आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!
Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!