काँग्रेस उमेदवार कन्हैय्या कुमार प्रचार करत असताना झाला हल्ला, हल्लेखोरांनी व्हिडीओ जारी करून केले समर्थन

काँग्रेस उमेदवार कन्हैय्या कुमारवर दिल्लीमध्ये हल्ला झाला असून यावेळी त्याच्यावर शाई फेकण्यात आली आहे. या हल्ल्याच्या वेळी येथे महिलांना मारहाण करण्यात आली असून हल्लेखोरांनी व्हिडीओ पोस्ट करून हल्ल्याचे समर्थन केले आहे. 

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि ईशान्य दिल्ली लोकसभेतील काँग्रेसचा उमेदवार कन्हैय्या कुमार हा शुक्रवारी प्रचार करत असताना त्याच्यावर हल्ला झाला. कन्हैय्या हा प्रचार करत असताना सात ते आठ जणांनी त्याच्यावर हल्ला केला. यावेळी त्याच्यावर काळी शाई फेकण्यात आली असून पूर्व दिल्लीतील न्यू उस्मानपुरा भागात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. कन्हैय्या कुमार हे भाजपचे दिल्ली माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. 

दोन हल्लेखोरांनी व्हिडीओ केला प्रसारित - 
काँग्रेस उमेदवार कन्हैय्या कुमार याच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी कन्हैय्या कुमारवर हल्ला का केला, याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, कन्हैय्या कुमार हा देश आणि सैनिकांच्या विरोधात बोलत असल्यामुळे आम्ही त्याच्यावर हल्ला केला आहे. 

आम आदमी पार्टीच्या महिला नागरसेविकेला केली मारहाण - 
कन्हैय्या कुमार यांच्यासोबत यावेळी आम आदमी पार्टीच्या नगरसेविका हल्ल्याच्या शिकार ठरल्या आहेत. छाया गौरव शर्मा यावेळी इतर महिलांसोबत प्रचार कामात होत्या. छाया शर्मा यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी आणि इतर महिला कन्हैय्या कुमार यांच्यासोबत प्रचार कामात होतो. त्यावेळी कन्हैय्या कुमार यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि शाई फेकण्यात आली. 

यावेळी महिला जखमी झाल्या आहेत. एक महिला पत्रकार नाल्यात पडली. छाया शर्मा यांनी सांगितले की त्यांच्या गळ्यातील स्टोनचा वापर करून त्यांना एका कोपऱ्यात हल्लेखोरांनी ओढले आणि त्यांना व पाटील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 
आणखी वाचा - 
मनोज जरांगे यांना तातडीने रुग्णालयात केले दाखल, छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
चक्क मुख्यमंत्र्यांच्या बॅगची तपासणी ? संजय राऊतांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची खबरदारी

Share this article