दिल्ली मद्य उत्पादन शुल्क मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रमुख आरोपी, ईडीने केले आरोपपत्र तयार

ईडीने ताज्या पुरवणी आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे. हे प्रकरण दिल्ली मद्य उत्पादन शुल्क धोरण 2021-22 शी संबंधित आहे.

ईडीने ताज्या पुरवणी आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे. हे प्रकरण दिल्ली मद्य उत्पादन शुल्क धोरण 2021-22 शी संबंधित आहे. या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात आम आदमी पार्टीचे नाव देण्यात आले आहे. 

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण केले रद्द - 
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण आता रद्द करण्यात आले आहे. अतिरिक्त जनरल सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी माहिती दिली असून त्यांनी म्हटले आहे की, "अरविंद केजरीवाल हे सेव्हन स्टार हॉटेलमध्ये राहिल्याचा पुरावा आहे. त्या ठिकाणची बिले या प्रकरणातील आरोपीने काही प्रमाणात भरली होती. त्यामुळे आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात मिळाले पुरावे - 
दिल्ली मद्य उत्पादन शुल्क धोरणात अरविंद केजरीवाल आणि हवाला ऑपरेटर यांच्यातील छत ईडीने शोधून काढली आहे. त्यांनी याबाबतची माहिती न्यायालयात दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या डिव्हाईसचा पासवर्ड देण्यास नकार दिल्यामुळे ऑपरेटर डिव्हाइसमधून चॅट्स परत मिळवण्यात आल्या असून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून - 
ईडीने केलेल्या अटकेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. मागील शुक्रवारी केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पक्षाचे आणखी दोन नेते सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदीया दोघेही तुरुंगातच आहेत. 
आणखी वाचा - 
मनोज जरांगे यांना तातडीने रुग्णालयात केले दाखल, छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
चार धाम मंदिराच्या परिसरात व्हिडीओ आणि रिल्स शूट करण्यावर बंदी, 31 मार्चपर्यंत VIP दर्शनही नाही

Share this article