तमिळनाडू येथील सरकारने कॉटन कँडीच्या विक्रीवर बंदी घातली आहे. खरंतर, कॉटन कँडीच्या माध्यमातून कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याचा धोका पाहता सरकारने त्याच्या विक्री आणि उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
Cotton Candy Banned in Tamil Nadu : तमिळनाडू येथील सरकारने कॉटन कँडीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. फूड डिपार्टमेंटच्या एनालिसिसमधून समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, कॉटन कँडीच्या माध्यमातून कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होतो. अशातच सरकारने कॉटन कँडीच्या उत्पादनासह विक्रीवर बंदी घातली आहे.
कॉटन कँडीमध्ये आढळले रोडामाइन-बी केमिकल
तमिळनाडू येथील कॉटन कँडीचे नमूने अन्नसुरक्षा विभागाकडून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणीत कॉटन कँडीमध्ये रोडामाइन- बी केमिकल असल्याचे समोर आले. हे केमिकल कॅन्सरसह अन्य गंभीर आजारांचे कारण ठरते. तमिळनाडू सरकारमधील आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी कॉटन कँडीच्या विक्रीसह उत्पादनावर बंदी घातली आहे. अशातच लहान मुलांना कॉटन कँडीचे सेवन करता येणार नाही.
लग्नसोहळ्यात किंवा कार्यक्रमात कॉटन कँडी दिसल्यास होणार कार्यवाही
अन्न सुरक्षा मानक अधिनियमानुसार, अन्न सुरक्षा विभागाला निर्देशन दिले आहेत की, राज्यात लग्नसोहळा किंवा एखाद्या पार्टीवेळी कॉटन कँडीची व्यवस्था करण्यात आल्यास त्यावर तातडीने बंदी घालावी. कॉटन कँडीची विक्री, उत्पादन अथवा पॅकेजिंग करताना आढळल्यास कायदेशीर कार्यवाही देखील केली जाऊ शकते.
पद्दुचेरीतही कॉटन कँडीवर बंदी
तमिळनाडू सरकारच्या आधी कॉटन कँडीच्या विक्रीवर पद्दुचेरी येथील सरकारनेही बंदी घातली होती. 9 फेब्रुवारीला सरकारने कॉटन कँडी आरोग्यासाठी घातक असल्याने त्याच्या उत्पादनासह विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली. याशिवाय दुकानदारांना देखील कॉटन कँडीच्या विक्रीसंदर्भात कठोर निर्देशन देण्यात आले आहेत. याशिवाय कॉटन कँडीची विक्री करताना आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असेही सरकारने स्पष्ट केलेय.
रोडोमाइन-बी केमिक आरोग्यासाठी घातक
रोडोमाइन-बी केमिकल आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे अॅलर्जी, न्यूरोटॉक्सिसिटी आणि कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. कॉटन कँडीमध्ये सिंथेटिक फूड कलरचा वापर केला जातो जो आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळेच कॉटन कँडीच्या विक्रीसह उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे.
आणखी वाचा :
बायको आपल्या हसण्याला भाळण्यासाठी व्यावसायिकाने लग्नाआधी केली खास सर्जरी, झाला मृत्यू
चंदीगड महापौर निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पुन्हा मतमोजणी करण्याचे आदेश