माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी मार्गदर्शक तत्वे अधिसूचित केली आहेत. यामुळे श्रवणदोष आणि दृष्टीदोष असलेल्या प्रेक्षकांना चित्रपटाचा आनंद घेता येऊ शकेल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी मार्गदर्शक तत्वे अधिसुचीत केली आहेत. श्रवण आणि दृष्टीदोष असलेल्या प्रेक्षकांना चित्रपटाचा यामुळे आनंद घेता येणार आहे.
आज दिव्यांगजनांसाठी संधी आणि सुलभतेवर विशेष लक्ष दिले जात आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती सशक्त व्हावी, सर्वसमावेशक समाजाची निर्मिती व्हावी, समता आणि सहकार्याची भावना समाजात एकोपा वाढेल आणि प्रत्येकजण एक होऊन प्रगती करेल, हे सुनिश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत पत्रकात म्हटले आहे.
या नवीन अधिसूचनेमुळे दृष्टीदोष आणि श्रवणदोष असलेल्या प्रेक्षकांसाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत. आपण याबाबतची मुख्य वैशिष्टय समजून घेऊयात.
मार्गदर्शक तत्वांचे उद्दिष्ट