धक्कादायक! मद्रास कॉफी हाऊसच्या डोसामध्ये आढळली झुरळं, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्यात संतप्त प्रतिक्रिया

दिल्लीतील मद्रास कॉफी हाऊसमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महिलेने रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेल्या डोसामध्ये चक्क एक नव्हे आठ झुरळं आढळून आली आहेत.

Madras Coffee House Viral Video:  दिल्लीतील (Delhi) प्रसिद्ध मद्रास कॉफी हाऊसमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने कॉफी हाऊसमधून तिच्यासाठी डोसा ऑर्डर केला असता त्यामध्ये झुरळं आढळल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारावर महिलेने पोलिसात धाव घेत म्हटले की, रेस्टॉरंटच्या मालकांनी तिला धमकी देत गप्प राहण्यास सांगितले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

7 मार्च रोजीची घटना
Mint च्या रिपोर्ट्सनुसार, मद्रास कॉफी हाउसमधील घटना 7 मार्चची आहे. दिल्लीतील प्रसिद्ध कनॉट प्लेस येथील मद्रास कॉफी हाऊसमध्ये दाक्षिणात्य पद्धतीचे उत्तम फूड मिळते. अशातच एका महिलेने रेस्टॉरंटमधून तिच्यासाठी डोसा ऑर्डर केला होता. या डोसामध्ये महिलेला आठ मृत झुरळं आढळली. याची तक्रार कॅफेच्या कर्मचाऱ्यांकडे केली असता तिच्यासोबत त्यांनी गैरवर्तवणूक केली. याशिवाय हॉटेलच्या मालकाने महिलेला तिचा पत्ता विचारण्यासह धमकी देत गप्प राहण्यासही सांगितले.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
इशानी नावाच्या महिलेने तिचा मद्रास कॉफी हाउसमधील अनुभव सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये डोसामध्ये झुरळं आढळल्याचे दिसून येत आहे. इशानीने आरोप केलाय की, रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी तिला व्हिडीओ काढण्यापासून रोखले आणि तिची डोसाची प्लेट घेऊन गेले.

इशानीने पोलिसात मद्रास कॉफी हाऊसच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय कॅफेमधल कर्मचाऱ्यांनी गैरवर्तवणूक केली. याशिवाय पोलिसांनी रेस्टॉरंटच्या मालकांकडे कॅफेचा परवाना मागितला असता तो देखील त्याने दिला नाही. सध्या पोलिसांकडून इशानीने दाखल केलेल्या तक्रारीसंबंधित अधिक तपास केला जात आहे.

नेटकऱ्यांनी दिल्यात अशा प्रतिक्रिया
इशानीचा व्हिडीओ सात हजार पेक्षा अधिक युजर्सने पाहिला आहे. यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, "खरंतर डोसामध्ये झुरळं आढळण्याचा प्रकार धक्कादायक आहे." दुसऱ्याने म्हटले की, "याबद्दल मालकाने नक्कीच उत्तर द्यावे." तिसऱ्याने म्हटले की, "मी कॅफेमधील फूडचा स्वाद घेण्याचा विचार करत होतो."

आणखी वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोईम्बतूर रोड शोला परवानगी, पोलिसांच्या नकारानंतर चेन्नई उच्च न्यायालयाने दिली परवानगी

अभिनेते सरथकुमार यांचा ऑल इंडिया समथुवा मक्कल काची हा पक्ष भाजपत झाला विलीन, सरथकुमार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Mamata Banarjee : डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल, टीएमसी पक्षाने मुख्यमंत्र्यांना गंभीर दुखापत झाल्याची दिली माहिती

Share this article